नांदेड - किनवट येथील आदिवासी दुर्गम भागातील झळकवाडीत कोंबड्यांसह विविध पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. अचानक मृत्यू झालेल्या पक्षांमुळे गावाभोवती दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभाग झोपेतच
राज्यातील शहरी व ग्रामीण भागात बर्ड फ्ल्यू वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने शहरी व गाव पातळीवर काम करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला अलर्ट राहण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, अद्याप या गावांमध्ये कुठलाही पशुसंवर्धन विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारीही फिरकला नाही. गावात कोंबड्यांची मृत्यू संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे.
हेही वाचा - नांदेड: कर्ज मिळेना... माजी नगराध्यक्षांचा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न!
हेही वाचा - बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न फसला; गुन्हा दाखल