ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनात चार जणांचा वीज पडून मृत्यू; सात जण जखमी

वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात आलेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ घातला. यावेळी अंगावर वीज पडून विविध घटनेत ४ जणांचा बळी गेला. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

author img

By

Published : May 15, 2020, 3:04 PM IST

vij
वीज पडून ठार झालेले मजूर

नांदेड - गुरुवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा वीज पडून मृत्यू झाला. रामकिशन शंकर चिखले, जिजाबाई रामदास गव्हाणे, कपिल कदम, किशन राघोजी भिसे असे वीज पडून ठार झालेल्यांची नावे आहेत. या विविध चार घटनांमध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे रामकिशन शंकर चिखले ( ७० ) हे गुरुवारी शेतात असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वारा सुटला व काही वेळातच विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चिखले हे शेतातीलच लिंबाच्या झाडाखाली थांबले होते, त्याचक्षणी अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. मंडळाधिकारी बी. एच. फुपाटे, तलाठी एस. के. मुंढे यांनी पंचनामा केला. गडगा व परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने वीजपुरवठा खंडित झाला. वायफना बु. ( ता. हदगाव ) येथील जिजाबाई रामदास गव्हाणे ( ४२ ), सुभद्रा गणेश नरवाडे ( ६० ), इंदिरा अशोक धनगरे ( ४५ ), लक्ष्मी संदीप धनगरे ( २५ ), अनिता विलास नरवडे (३०) हे रामदास मुधळे यांच्या शेतात काम करत असताना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान विजा चमकून पाऊस सुरू झाला. यात जिजाबाई यांच्या अंगावर वीज पडली. त्यांना वायफना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

यातील इंदिराबाई धनगरे, लक्ष्मी संदीप धनगरे या दोघी जखमी असून, त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. वारंगटाकळी (ता. हिमायतनगर) येथे कपिल आनंदराव कदम (२७), अक्षय अवधूत कदम ( २० ), सुनील आनंदराव कदम (३०), आनंदराव संतूराम कदम (५२) हे शेतात काम करत असताना वीज कोसळली. यात चौघेही जखमी झाले. यातील कपिल कदम यांचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. शिवणी येथेही वीज अंगावर पडून किशन राघोजी भिसे (४५, रा. शिवणी) यांचा मृत्यू झाला. तर लक्ष्मण रामराव देशमुखे (३०), राजू नागोराव भिसे (३२) हे जखमी असून त्यांना शिवणी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.