ETV Bharat / state

तेलंगाणात 'बीआरएस'ची वस्तुस्थिती उघड : अशोक चव्हाण - काँग्रेसने विजय मिळवला

Ashok Chavan Reaction : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात भाजपाने विजयी आघाडी घेतली आहे. तेलंगणात मात्र भारत राष्ट्र समितीच्या सत्तेला सुरुंग लावत काँग्रेसने विजय मिळवला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तेलंगणात बीआरएसची वस्तुस्थिती उघड झाल्याचं म्हटलंय.

Ashok Chavan Reaction
अशोक चव्हाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 9:23 PM IST

नांदेड Ashok Chavan Reaction : तेलंगणातील बीआरएसचे राज्य सरकार केवळ सवंग प्रसिद्धीसाठी घोषित केलेल्या योजनांवर आणि अवास्तव प्रसिद्धीवर तगले होते. जाहिरातीत भलेही गुलाबी चित्र रंगवले जात होते, मात्र वस्तुस्थिती काळीकुट्ट होती. कधी ना कधी खरे चित्र समोर येणारच होते आणि वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तेलंगणाच्या मतदारांनी बीआरएसला नाकारले : बीआरएसने शेतकऱ्यांना वर्षाला केवळ १० हजार रुपये देऊन इतर सर्व योजना जवळपास संपुष्टात आणल्या. तेलंगणात मोफत पीककर्ज नव्हती, एमएसपीनुसार शेतमाल खरेदीसाठी यंत्रणा नव्हती, खासगी खरेदीदारांकडून शेतकऱ्यांचे शोषण सुरु होते, त्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत होत्या. सिंचन प्रकल्पांवरील खर्च वाढवून भ्रष्टाचार सुरू होता. राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. सरकारी मंडळे, महामंडळे, शासकीय योजनांसाठीच नव्हे तर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्यायलाही बीआरएसच्या राज्य सरकारकडे पैसा नव्हता. कर्ज काढून, सरकारी जमिनी विकून आणि अंदाधुंद पद्धतीने दारू दुकानांचे परवाने वाटून तेथील राज्य सरकार दिवस पुढे ढकलत होते. रोजगार निर्मिती, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे पूर्ण कानाडोळा करण्यात आला होता. त्यामुळेच तेलंगणाच्या मतदारांनी बीआरएसला नाकारून काँग्रेसला स्पष्ट बहुमताने निवडून दिले. अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली

या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चांगली कामे केली : मध्यप्रदेश, छत्तिसगड आणि राजस्थानचे निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहेत. राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चांगली कामे केली, चांगल्या योजना राबवल्या. दोघांचीही प्रतीमा उत्तम होती. या तीन राज्यातील निकालांचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून विश्लेषण करून उणिवा शोधल्या जातील आणि दुरुस्तही केल्या जातील, असे अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार नाही, याचा आम्हाला पूर्ण विश्वास - शरद पवार
  2. ABVP सदस्य ते तेलंगणात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार! असा आहे रेवंत रेड्डी यांचा प्रवास
  3. मोठी बातमी! रेवंत रेड्डींना भेटणं तेलंगाणा पोलीस महासंचालकांना पडलं महागात; EC कडून निलंबनाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.