ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या काळात २१ हजार गरजूंना घरपोच जेवणाची पाकिटे

author img

By

Published : Apr 26, 2020, 5:48 PM IST

लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील कुणीही उपाशी राहू नये, यासाठी हा उपक्रम राबवल्या जात आहे. तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांना देखील हे जेवण पुरवण्यात येत आहे. त्यासाठी पहाटे दोन वाजल्यापासून अन्न शिजवून त्याचे पाकीट तयार केली जात आहेत.

food distribution by social workers in nanded
लॉकडाऊनच्या काळात २१ हजार गरजूंना घरपोच जेवणाची पाकिटे; सामाजिक कार्यकर्त्याचा उपक्रम

नांदेड - धर्माबाद सीमावर्ती भागातील धर्माबाद तालुक्यात आपल्या गावकऱ्यांचे किचन हा उपक्रम राबवल्या जात आहे. दररोज तब्बल 21 हजार नागरिकांना घरपोच जेवनाची पाकिटे पुरवले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुबोध काकाणी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम श्रमदानाच्या माध्यमातून सुरू आहे.

लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील कुणीही उपाशी राहू नये, यासाठी हा उपक्रम राबवल्या जात आहे. तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांनादेखील हे जेवण पुरवण्यात येत आहे. त्यासाठी पहाटे दोन वाजल्यापासून अन्न शिजवून त्याचे पाकीट तयार केली जात आहेत. त्यानंतर ही पाकिटे टेम्पोतून गावोगावी वाटप केल्या जात आहेत. या सर्व प्रक्रियेत स्वच्छतेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सॅनिटायझरचा देखील वापर केला जात आहे. आपल्या गावकऱ्यांचे किचन या उपक्रमात शहरातील अधिकारी, कर्मचारी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने श्रमदान करतायत, त्यातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्या जात आहे.

विशेष म्हणजे हा सगळा भाग तेलंगणा सीमेवरचा असल्याने तिथे तांदूळ हेच मुख्य अन्न आहे, त्याचीच काळजी घेऊन रोजच तांदळाचे वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न तयार केले जात आहे. काकाणी परिवाराने पुढाकार घेत सुरू केलेला हा उपक्रम धर्माबाद तालुक्यात प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.