नांदेड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अर्धापूर शहरात रहाणाऱ्या मजूर, वृध्द, अपंग, विधवा, पालात राहणारे भटके व गरजूंसाठी अन्नदान करण्यात येत आहे. मारुती मंदिर संस्थाच्या पुढाकारातून ही मदत केली जात आहे.
हेही वाचा- मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
आतापर्यंत शंभर कुटुंबाला भाजीपोळी वाटप करण्यात आली आहे. शहरात कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी संस्थानाने उपक्रम सुरू केला आहे. गरजूंनी आपली नावे संस्थानाकडे नोंदवावीत असे आवाहन संस्थांनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लाॅकडाऊन घोषीत केल्याने हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत. हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशी परिस्थिती गरिबांची आहे. त्यामुळे शहरातील मारुती मंदिर संस्थाच्या पुढाकातून अन्नदानाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरातील अर्धापूर-नांदेड रस्त्यावरील पालामध्ये राहणाऱ्या भटक्या बांधवांना पालावर जावून अन्न वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, संस्थांनाचे आध्यक्ष प्रविण देशमुख, उपाध्यक्ष प्रल्हाद माटे, रमेश मेटकर आदी उपस्थित होते. तर उपक्रम राबविण्यासाठी गुणवंत विरकर, गजानन वाघमारे, योगेश वाघमारे, अनिल स्वामी, बसवेश्वर नागलमे, गजानन मेटकर, संजय शिंदे, संतोष सिनगारे, यांनी पुढाकार घेतला आहे.
घरपोच अन्न पाहिजे असल्यास संपर्क करा...
अर्धापूर शहरातील गरजूंसाठी घरपोच अन्न हा उपक्रम मारुती मंदिर संस्थांनाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. ज्या गरजूंना घरपोच अन्न पाहिजे अशांनी अध्यक्ष प्रविण देशमुख, उपाध्यक्ष प्रल्हाद माटे, सचिव दत्ता शिंदे यांच्याशी संपर्क करा असे आवाहन संस्थांनाच्या वतीने करण्यात आले आहे.