नांदेड - मुखेड तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुंडेराव नारायणराव सुळे असे त्या आरोपीचे नाव आहे.
अंदाजे दोन महिन्यांपूर्वी एका गावालगत असलेल्या शिवारात दुपारी बारा वाजता आरोपी गुंडेराव नारायणराव सुळे याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
याप्रकरणी मुक्रमाबाद पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देगलूर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरोदे करत आहेत.