ETV Bharat / state

मुदखेड नगराध्यक्षांसह दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल - Atrocities Act

अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्या प्रकरणी, मुदखेड नगर पालिकेचे नगराध्यक्ष आणि इतर दोघांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. बजरंग खोडके यांच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲट्रॉसिटी
ॲट्रॉसिटी
author img

By

Published : Feb 11, 2021, 6:26 PM IST

नांदेड - अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्या प्रकरणी, मुदखेड नगर पालिकेचे नगर अध्यक्ष आणि इतर दोघांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. बजरंग खोडके यांच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंदुकीचा धाक दाखवत केली अश्लील शिवीगाळ-

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुदखेडच्या नगराध्यक्षासह दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत बजरंग वामनराव खोडके ८ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नगर पालिकेत गेले होते. मात्र नगर पालिका आवारात भेटलेल्या नगराध्यक्ष मुजीब अन्सारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोडके यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तु नगर पालिकेत का आलस? तेरा यहा कुछ नहीं होनेवाला, असे म्हणत त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि बंदुक काढत धमकावले, असे बजरंग खोडके यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत ‌नमुद केलं आहे.

नगराध्यक्षासंह दोघांवर ॲट्रॉसिटी-

यावरून मुदखेड पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार नगरपालिकेचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अन्सारी जागीरदार, अब्दुल सलाम आणि नागराध्यक्षांचे वाहन चालक यांच्यावीरूध्द अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी पोलीस बाळासाहेब देशमुख हे करीत आहेत.

हेही वाचा- शिक्षक आक्रमक : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आत्मदहन करण्याचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.