नांदेड - राज्यात सत्तेचे बेलगाम घोडे उधळले आहेत. धुळे, रत्नागिरी व अन्य एका ठिकाणी एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा केला पाहिजे. राज्य सरकारला सत्तेचा उन्माद चढला असून त्यांनी पोलिस प्रशासनास हाताशी धरले आहे. विकृतांना राजाश्रय देण्याचे काम करीत आहे, असा आरोप भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी नांदेड येथे केला. भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखालील स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
निल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल महिला आयोगाला अध्यक्ष नाहीराज्यात सामान्यांवर हल्ले होत असत. आता प्रशासकीय यंत्रणेवर हल्ले होऊ लागले आहेत. ठाणे महापालिकेच्या महिला सहाय्यक आयुक्तांचे एका फेरीवाल्याने बोट छाटले. वाशिमच्या पोलिस कर्मचारी महिलेवर नांदेडच्याच एका पोलिस निरीक्षकाने बलात्कार केला. एका महिला तहसीलदाराची 'हॅरासमेंट' सुरु आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर सरकारने अद्याप नेमणूक केली नाही, हे संतापजनक आहे. सरकारने महिला सुरक्षेची जणू व्याख्याच बदलली आहे. यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, प्रणिताताई देवरे- चिखलीकर हे उपस्थित होते.
हेही वाचा - सायरा बानू यांचा अँजिओग्राफीला नकार, दिलीप कुमार यांच्या मृत्यूने नैराश्य