ETV Bharat / state

भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तुंबळ हाणामारी, नांदडेमध्ये प्रचारसभेतील वक्तव्यावरुन झाला वाद - ncp

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ वाई बाजार येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुमित राठोड यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Apr 21, 2019, 12:01 PM IST

नांदेड - प्रचारसभेत एकेरी उल्लेख केल्याने तसेच, कुटूंबीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने आज माहुर येथे शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यामुळे माहूर शहरात संचारबंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ वाई बाजार येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुमित राठोड यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली. तसेच जाधव कुटूंबीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात वाद झाला. याचे पर्यवसन हाणामारीत झाले. या हाणामारीच्या घटनेमुळे माहूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आद्यपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही.

Intro:प्रचार सभेतील वक्तव्यामुळे माहुरात राडा

सेना- भाजप व राष्ट्रवादी मध्ये तुंबळ हाणामारी

नांदेड : प्रचार सभेत एकेरी व कुटूंबियांबद्दल वाद निर्माण करणारे वक्तव्य केल्याने आज माहुर येथे शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकार्‍यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने माहुर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तणावामुळे माहुर शहरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.Body:
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ वाई बाजार येथे आयोजित सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुमित राठोड यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली. तसेच कुटूंबियांबद्दल कलह निर्माण होईल असे जाहिर भाष्य केल्याने हा मारहाणीचा प्रकार घडला असल्याचे वृत्त आहे.Conclusion:
या हाणामारीच्या घटनेमुळे माहुर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आद्यपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.