नांदेड - देशातील तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेवून दि. १८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती. या घटनादुरुस्तीचा सावरगाव येथील शेतकऱ्यांनी किसान विरोधी दिन म्हणून १८ जून रोजी आपल्या घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला आहे.
१८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती
सर्वप्रथम १८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती झाली. त्या घटना दुरुस्तीत घटनेने शेतकऱ्यांकरिता दिलेले सर्व अधिकार गोठवून अतिरिक्त नवव्या परिशिष्टाची निर्मिती करून त्यात तेरा शेतकरीविरोधी कायदे समंत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने तीन कायद्यांचा समावेश होता. आवश्यक वस्तु, सिलिंग आणि भूमि अधिग्रहण कायदा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असा शेतकरी संघटनेचा दावा आहे.
किसानपूत्र आंदोलनाच्या माध्यमातून विरोध -
शेतकऱ्यांचे पंचप्राण मानले जाणाऱ्या शरद जोशींच्या विचारांना पुढे घेऊन जाणारी पण नोंदणीकृत नसलेली किसान पुत्राची संघटना किसान पुत्र आंदोलन या संघटनेचे बालाजी आबादार नांदेड जिल्ह्यात शेतकरी प्रश्नावर हिरिरीने भाग घेवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सावरगाव येथे विजय केशवराव जाधव, दत्ता केशव आबादार, राजेश पांचाळ या शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला आहे.
घरावर लावले काळे झेंडे -
या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी जनजागृती केली जात आहे. या संघटनेच्या वतीने १८ जून हा किसान विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिवशी सावरगाव येथील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या घरावर काळे झेंडे लावून शेतकरी विरोधी असलेल्या पहिल्या घटनादुरुस्तीचा निषेध व्यक्त केला आहे. अशी माहिती किसान पुत्र संघटनेचे बालाजी आबादार यांनी दिली आहे.
शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ सावरगावात शेतकऱ्यांनी घरावर लावले काळे झेंडे - घरावर काळे झेंडे लावून शेतकऱ्यांकडून सरकारी कायद्याचा निषेध
देशातील तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेवून दि. १८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती. या घटनादुरुस्तीचा सावरगाव येथील शेतकऱ्यांनी किसान विरोधी दिन म्हणून १८ जून रोजी आपल्या घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला आहे.