ETV Bharat / state

देगलूरमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन - नांदेड

उपजिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयाबाहेर येऊन मागणीचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
author img

By

Published : May 29, 2019, 10:19 AM IST

नांदेड - जिल्ह्यातील देगलूर येथे शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी पीक विमा, दुष्काळी मदत तसेच कर्जमाफी देण्याच्या मागण्या करण्यात आल्या. दुष्काळी संघर्ष समितीचे प्रमुख कैलास येसगे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयाबाहेर येऊन मागणीचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी बाहेर येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा चालूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका घेतल्याचे कैलास येसगे यांनी सांगितले आहे.

Intro:नांदेड - देगलूर येथे पीक विमा,दुष्काळी मदत,व संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी दुष्काळ संघर्ष समितीचा हल्लाबोल.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पिक विमा, दुष्काळी मदत तसंच संपुर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी दुष्काळी संघर्ष समितीचे प्रमुख कैलास येसगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.Body:
यावेळी आंदोलकांनी उपविभागीय कार्यालयाबाहेर येऊन मागणीचे निवेदन स्विकारण्याची मागणी करत उपजिल्हाधिकाऱ्याच्या दालना समोर आंदोलन केले,त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अखेर उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी बाहेर येऊन मागण्यांचे निवेदन स्विकारले.Conclusion:
दरम्यान, मागण्या मान्य होई पर्यंत हा लढा चालूच ठेवणार असल्याची भूमिका समितीचे प्रमुख कैलास येसगे यांनी असल्याचे यावेळी सांगितले.आंदोलनात शेकडो शेतकरी सामिल झाले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.