ETV Bharat / state

शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बालाजी पावडे हा शेतकरी विष्णुपुरी शिवारात मृतावस्थेत आढळून आले. याबाबत शिवाजी हंबरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nanded
शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Dec 30, 2019, 11:31 AM IST

नांदेड - शहरापासून जवळ असलेल्या विष्णुपुरी येथील एका वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह त्याच शिवारात आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शेतीच्या वादातून दिलेल्या त्रासामुळे या शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी केली. या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी ७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बालाजी वामनराव पावडे (वय ६९), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

विष्णुपुरी शिवारात बालाजी पावडे हे शेतकरी मृतावस्थेत आढळून आले. याबाबत शिवाजी हंबरडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतु ही घटना उघडकीस आल्यावर मुलगा सुनील पावडे यांनी बालाजी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

हेही वाचा - दैव बलवत्तर म्हणून वाचले पन्नास भाविकांचे प्राण!

आपल्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची त्यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार, मृत बालाजी यांना त्यांच्या वाट्याची शेती त्यांच्या नावावर करू न देता शेतात जाऊन त्यांचे औत काही जणांनी अडविले, पेरणी थांबवली, शेतातील बोअरवेलमध्ये दगड टाकले, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. नारायण हंबर्डे, संतोष नारायण रा. गुंडेगाव, कमलबाई पावडे, सीमा पावडे, माधव पावडे रा. विष्णुपुरी, नारायण मोरे, बालाजी मोरे रा. टेळकी लोहा यांनी त्रास बालाजी यांना विविध प्रकारे दिला होता. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार सुनील यांनी दिली. त्यावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी उपरोक्त ७ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर, उपनिरीक्षक जावेद शेख पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - ऊस तोडणी मशीन बिघडल्यानंतर ते शेतातच जळून खाक

Intro:नांदेड :शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

नांदेड : शहरापासून जवळ असलेल्या विष्णुपुरी येथील एका वृध्द शेतकऱ्याचा मृतदेह त्याच शिवारात आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेतीच्या वादातून दिलेल्या त्रासामुळे या शेतक-यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:विष्णुपुरी शिवारात बालाजी वामनराव पावडे रा.विष्णुपुरी हे शेतकरी मृतावस्थेत आढळून आले. ते ६९ वर्षांचे होते. याबाबत शिवाजी हंबरडे यांनी दिलेल्या फिर्यादी वर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोहेकाँ माधव गवळी तपास करीत आहेत. परंतु ही घटना उघडकीस आल्यावर सुनील बालाजी पावडे यांनी मयत बालाजीचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि आपल्या वडिलांनी आत्महत्या केली असून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची
तक्रार दिली होती. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी सात जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार, मयत बालाजी यांना त्याच्या वाट्याची शेती त्यांच्यानावावर करु न देता त्याच्या शेतात जाऊन त्याचे औत काही जणांनी अडविले, पेरणी थांबवली, शेतातील बोअरवेलमध्ये दगड टाकले, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून सुरू होता
नारायण हंबर्डे, संतोष नारायण रा.गुंडेगाव, कमलबाई
पावडे, सीमा पावडे, माधव पावडे रा.विष्णुपुरी,
नारायण मोरे, बालाजी मोरे रा.टेळकी लोहा यांनी त्रास दिला होता.Conclusion:त्यामुळे बालाजी पावडे यांनी आत्महत्या
केल्याची तक्रार सुनील पावडे यांनी दिल्यावरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी उपरोक्त सात जणांविरुध्द गुरनं ६३६/१९ कलम ३०६, ५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक जावेद शेख पुढील तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.