ETV Bharat / state

Fake Country liquor : बनावट देशी मद्यसाठ्यावर नांदेडसह बीडमध्ये कारवाई - Fake Country liquor

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ( Excise department ) नांदेडसह बीडमध्ये बनावट मद्य ( Fake country liquor ) साठावर कारवाई ( Action on stocks of fake country liquor ) केली. यात एकुण सात लाख ६४ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे.

Fake Country liquor
Fake Country liquor
author img

By

Published : Nov 16, 2022, 4:03 PM IST

नांदेड - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ( Excise department ) पथकाने नांदेडसह बीड जिल्हयात बनावट मद्यसाठयावर छापा ( Action on stocks of fake country liquor ) टाकला. दोन्ही ठिकाणहून एक चार चाकी वाहन व बनावट देशी मद्य ( Fake country liquor ) निर्मिती करण्या करिता लागणारे साहित्य, मशीन असा एकुण सात लाख ६४ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली.

बनावट देशी मद्यसाठ्यावर नांदेडसह बीडमध्ये कारवाई

बनावट दारूचा पर्दाफाश - नांदेडमधील नमस्कार चौक ते माळटेकडी ऊड्डाणपूल या रस्त्यावर एका पिकअपमध्ये क्र.(एमएच१२-एसएक्स -०६५५) ६० बॉक्स बनावट देशी मद्य (भिंगरी संत्रा), दोन अँन्ड्रॉईड मोबाईल जप्त केले आहे. या प्रकरणी आरोपी भागीरथसिंह दयालसिंह सोडा (रा. धोलिया राजस्थान), प्रीतेश गोविंद वाडेकर (रा.नांदेड) दोघांना अटक केली आहे. तपासात या आरोपीस विचारणा केली असता आरोपीने सांगितल्या प्रमाणे बीड जिल्ह्यातील नवगण राजूरी येथील शेतामध्ये जाऊन पथकाने छापा मारला. तिथे बनावट मद्य बाटलीत भरण्याकरिता वापरण्यात आलेली मशीन, बनावट मद्य भरलेल्या बाटल्याचे बुच (कॅप) सिलबंद करण्याकरीता वापरण्यात आलेली मशीन, ९० मी. लि. क्षमतेच्या ३५० रिकाम्या बाटल्या, बनावट देशी मद्याचे रिकामे कागदी खोके (कार्टून्स), दोन अँन्ड्रॉईड मोबाईल इतर साहित्याचा मुद्देमाल मिळून आले.

सात लाख ६४ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त - या प्रकरणी आकाश श्याम जाधव (रा. बीड), विजेश कुमार भुराराम सैनी (रा. चौकरी ता. खंडेला (जि.सीकर (राजस्थान) ह. मु. बीड), गोविंद राजेंद्र शर्मा (रा. धोलिया ता. लाडणू जि.नागौर (राजस्थान) ह.मु.बीड) यांना अटक करण्यात आली. बनावट देशी मद्य (भिंगरी संत्रा) व मद्य निर्मिती करण्या करिता लागणारे साहित्य पुरविणारा आरोपी आसिफ रमजान तांबोळी (रा. जावई वाडी ता. इंदापुर जि. पुणे) हा आरोपी फरार आहे. सदर दोन्ही ठिकाणहून एक चार चाकी वाहन, बनावट देशी मद्य मद्य निर्मिती करण्या करिता लागणारे साहित्य, मशीन व इतर असा एकुण सात लाख ६४ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाच आरोपींना अटक - सदर गुन्ह्यात आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली. १ आरोपी फरार आहे. त्यांचा शोध चालु आहे. जवान बालाजी पवार जवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुय्यम निरीक्षक अनिल पिकले यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम तसेच अन्य अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

नांदेडमधून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त - वरील गुन्ह्यातील आरोपींनी दिलेल्या माहिती नुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड शहर या पथकाने आरोपी जसपालसिंघ गुरुचरणसिंघ संघु यांचे ताब्यातील चिखलवाडी नांदेड येथे छापा मारून ३० बॉक्स बनावट देशी मद्य, एक अँन्ड्रॉईड मोबाईल असा एकुण एक लाख १५ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. जसपालसिंघ गुरुचरणसिंघ संघु या आरोपीस या अटक करण्यात आली. हा मद्यसाठा पुरविणारे आरोपी नामे प्रीतेश गोविंद वाडेकर, आकाश श्याम जाधव अटकेत आहेत. जवान विकास नागमवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निरिक्षक आनंद चौधरी यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम तसेच अन्य अन्वये गुन्हा नोंद केला असून ज्याचा पुढील तपास निरिक्षक आनंद चौधरी हे करित आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.