नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 च्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 6 ऑक्टोबरपासून घेण्याचे निश्चित झाले होते. पण, विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 24 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या 30 सप्टेंबरच्या तातडीच्या बैठकीतील ठरावानुसार 6 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी काढले आहे.
यासर्व परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. उन्हाळी-2020 च्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखेतील बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी सदर बाब आपल्या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या निर्देशनास आणून द्यावी, असेही परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
हेही वाचा - नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसह १३०० सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर....!