नांदेड - लॉकडाऊनच्या नियमांचे सर्वत्र पालन होत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा खडा पहारा आहे. असे असतानाही शहरातील अबचलनगर येथील एक कारचालक ज्याच्यावर शासकीय रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते, तोच चालक प्रवाशांकडून मोठी रक्कम घेऊन पंजाब राज्यात अनेकवेळा जाऊन आला आहे, अशी चर्चा सध्या शहरात जोर धरत आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद असताना देखील हा चालक जिल्ह्यातून बाहेर गेलाच कसा? आणि जिल्ह्यात करत आला कसा? हा प्रश्न नांदेडकरांना पडला आहे.
हेही वाचा... रशियामध्ये एका दिवसात आढळले तब्बल दहा हजार कोरोना रुग्ण!
'तो' चालक प्रतिव्यक्ती घेत होता तब्बल तीस ते चाळीस हजार रुपये
नांदेडमध्ये पंजाब येथील अडकलेल्या यात्रेकरूंच्या परिस्थितीचा फायदा घेत. संबंधित चालकाने नांदेड ते पंजाब येथील प्रवासासाठी या प्रवाशांकडून प्रतीव्यक्ती तीस ते चाळीस हजार रुपये घेतले असल्याचे बोलले जात आहे. जवळपास चार वेळा त्याने लॉकडाऊनदरम्यान प्रवास केल्याचे म्हटले जात आहे. पण या यात्रेकरूला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांच्या सीमा पार करून जावे लागत होते. माग, तो सहजासहजी चार वेळा गेला कसा? त्यासाठी त्याने पोलिसांना देखील चिरीमिरी दिली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हा चालक पंजाब राज्यात प्रवाशांना घेऊन गेला. तर त्याला परवानगी कुठून मिळाली असावी. हा चालक कुठेच गेला नसेल तर याला कोरोनाचे संक्रमण झाले कसे? असे आता ग्रीनझोन कडून रेडझोनकडे सरकणाऱ्या नांदेडकरांना पडला आहे. नांदेड जिल्हा लॉकडाऊनच्या काळापासून ग्रीनझोनमध्ये होता. मात्र, आता नांदेड रेडझोनकडे सरकताना दिसत आहे.