ETV Bharat / state

नांदेडात डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेचा गर्भपात - नांदेड पोलीस बतमी

डॉ. सुंकरवार याने पीडित मुलीस वेगवेगळी आमिषे दाखवली. एवढचं नव्हे तर धमकी देत दिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत डॉक्टरने सतत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला आहे. अत्याचारामुळे अल्पवयीन पीडिता ही गर्भवती राहिली होती. पीडितेच्या पोटात काल दुखू लागल्याने तिला नातेवाईकांनी शहरातील एका नामांकित दवाखान्यात आणले. तेथील डॉक्टरांनी पीडितेची तब्येत पाहून काही चाचण्यांसाठी तिला अन्य एका दवाखान्यात पाठविले.

doctor arrested for physical abused a minor girl at kinvat in nanded
नांदेडात डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
author img

By

Published : May 9, 2022, 2:14 PM IST

नांदेड - किनवट शहरात दवाखान्यात कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने विविध आमिष दाखवून सातत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडिता गर्भवती राहिल्याने हे प्रकरण उघडकीस आले. पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नराधम डॉक्टरवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. डॉ. विकास सुंकरवार असे या आरोपीचे नाव आहे.

दवाखान्यात कर्मचारी म्ह्णून काम करत होती मुलगी - आपल्या दवाखान्यात कामासाठी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने सातत्याने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टराला अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडालीय. किनवट शहराच्या डॉक्टरलेन भागात डॉ. विकास सुंकरवार या डॉक्टरचा दवाखाना आहे. या दवाखान्यात एक अल्पवयीन मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी म्हणून काम करत होती.

पोटात दुखू लागल्याने प्रकार उघडकीस - डॉ. सुंकरवार याने पीडित मुलीस वेगवेगळी आमिषे दाखवली. एवढचं नव्हे तर धमकी देत दिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत डॉक्टरने सतत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला आहे. अत्याचारामुळे अल्पवयीन पीडिता ही गर्भवती राहिली होती. पीडितेच्या पोटात काल दुखू लागल्याने तिला नातेवाईकांनी शहरातील एका नामांकित दवाखान्यात आणले. तेथील डॉक्टरांनी पीडितेची तब्येत पाहून काही चाचण्यांसाठी तिला अन्य एका दवाखान्यात पाठविले.

डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल - पीडित मुलीचा चाचणीपूर्वीच गर्भपात झाल्याने तिला तातडीने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी पीडित मुलीने इन कॅमेरा जबाब नोंदवला आहे. डॉ. विकास सुंकरवार यानेच आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा जबाब तिने पंचासमक्ष नोंदविला आहे. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी नराधम डॉ. विकास सुंकरवार याला तातडीने ताब्यात घेतलं. त्याच्याविरूद्ध कलम ३७६, पोक्सो ४, ६ व इतर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे, अशी सहायक पोलीस निरीक्षक घुले यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.