नांदेड - खासगी शिकवणी घेणाऱ्या संघटनेच्या राज्याच्या कार्यकारीणीची बैठक आज (दि. 7 नोव्हेंबर) नांदेडमध्ये घेण्यात आली. येत्या 23 नोव्हेंबरपासून खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी या बैठकीद्वारे करण्यात आली आहे.
नऊ महिन्यापासून शिकवणी बंद असल्याने होते आहे नुकसान
गेल्या नऊ महिन्यापासून खासगी शिकवण्या बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक वातावरणाशी दुरावत चालला आहे. त्यासोबतच खासगी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खासगी शिकवण्या सुरू करण्यास सरकारने तात्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्वच शिकवणी चालक श्रीमंत नसतात
अनेक विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडेही पाहणे तितकेच महत्वाचे आहे. सर्वच खासगी शिकवणी चालक श्रीमंत नाहीत. अनेक गरीब व नौकरी न लागलेल्या बेरोजगार शिक्षकांचा उदरनिर्वाह यावर चालतो. त्यात कोरोना सोबतच जगायचे, असे शासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्हीही शासनाच्या नियमांचे पालन करून शिकवणी चालवू, अशी प्रतिक्रिया बंडूपंत भुयार यांनी दिली.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैशाच्या खाली; एक हजार ५६२ गावांचा समावेश