ETV Bharat / state

राजीव सातव यांच्या मृत्यूची उच्चस्तरिय चौकशी करा; नांदेड जिल्ह्यातून राष्ट्रपतींकडे मागणी - राजीव सातव यांच्या मृ्त्यूची चौकशी

डाॅक्टरांच्या अक्षम्य चुकीमुळे सातव यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आता नांदेडवासींकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर केलेले उपचार आणि त्यांच्या संशयास्पद मृत्यूची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी अर्धापूर (जि. नांदेड) शहरातील वतीने देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्याकडे करण्यात आली

सातव यांच्या मृत्यूची उच्चस्तरिय चौकशी करा

author img

By

Published : May 21, 2021, 9:44 AM IST

नांदेड - काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली होती. मात्र, डाॅक्टरांच्या अक्षम्य चुकीमुळे सातव यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप आता नांदेडवासींकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर केलेले उपचार आणि त्यांच्या संशयास्पद मृत्यूची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी अर्धापूर (जि. नांदेड) शहरातील वतीने देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदन
निवेदन
देशातील ओबीसीचे मोठे नेतृत्व -दिवंगत खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुणे येथे जहांगीर रुग्णालयात २३ एप्रिल २०२१ पासून उपचार सुरू होते. या दरम्यान गेल्या २२ दिवसापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याबाबत बातम्या येत असताना १६ मे २०२१ रोजी सकाळी त्यांच्या मृत्यूची अचानक बातमी कळाली व समस्त बहूजन ओ.बी.सी. समाजाला धक्काच बसला. राजीव सातव हे देशातील बहूजनाचे ओबीसी, एससी आणि एसटी समाजाचे राष्ट्रीय नेते होते. त्यांनी ओबीसी बहूजन समाजाच्या प्रश्नावर व त्यांच्या आरक्षणा संदर्भात संसदेत हजारो प्रश्न विचारले होते. ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, सर्वोच्च पदावर ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील सदस्याला आरक्षण देण्यात यावे. यासाठी ते संघर्ष करीत होते. तसेच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावे. यासाठी त्यांनी संसदेत जोरदार मागणी केली होती.
निवेदन
निवेदन
डाॅक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप....अशा प्रकारे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या एका सुसंस्कारित, बुध्दीमान, हूशार आणि अभ्यासू बहूजन ओबीसी नेत्याचा अगदी तरुण वयात संशयास्पद मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना हायर डोस दिल्यामुळे त्यांचे फुफुस फाटले. अशा बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राष्ट्रीय नेत्याच्या संशायस्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी भारत सरकारने उच्च स्तरिय समिती गठीत करून या समीतीमार्फत स्वर्गीय राजीव सातव यांच्या मृत्यूपूर्वी केलेले तपासणी अहवाल, त्यांच्यावर केलेले औषधोपचार आणि त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अर्धापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० मे रोजी महामाहीम राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे अर्धापूर तहसीलदारांमार्फत निवेदन देवून केली आहे. संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप-या निवेदनातून स्वर्गीय राजीव सातव हे देशातील ओबीसी , एससी आणि एस. टी. समाजाची राष्ट्रीय संपत्ती होते. त्यांचा मृत्यू म्हणजे बहूजनांच्या राष्ट्रीय संपत्तीवर हल्ला असुन देशातील बहूजनांचे कधीही न भरून निघणारे अपरिमित नुकसान झाले आहे. देश, राज्य आणि जिल्ह्यातील वंचित बहूजन समाजाच्या विकासाची दुरदृष्टी असलेला नेता सातव यांच्या रूपाने गमावल्याची खुप मोठी खंत बहुजन समाजातून व्यक्त होत आहे. अशा या राजकारणांतील राजहंस असलेल्या लोकनेत्याचा मृत्यू कसा झाला ? त्याची कारणे, निदान, उपचार व तपासणी अहवाल सार्वजनीक करून त्यांच्या मृत्यूची सत्यता जनतेसमोर यावी. या प्रकरणात हलगर्जी करून सातव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. अशा तिव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
राजीव सातव यांच्या मृत्यूची उच्चस्तरिय चौकशी करा

यांनी दिले निवेदन...-या निवेदनाच्या प्रती माननीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना देण्यात आल्या असून त्यावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आनंद सिनगारे, ज्ञानदीप साखरे, सतिष सोनटक्के, तुकाराम माटे, चंद्रकांत विरकर, सुभम राऊत, सुमित सिनगारे, होनाजी जोगदंड, प्रवीण सोनटक्के, संदेश खंदारे, राजू सरोदे, संदिप राऊत आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.