नांदेड - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत होणारही घट ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 110 अहवालांपैकी 91 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर अँटिजेन तपासणीद्वारे 23 अहवाल बाधित आहेत.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 87 हजार 727 इतकी झाली. यातील 83 हजार 392 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 773 इतकी आहे. त्यातील 76 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. याचबरोबर मागील 24 तासांत 5 बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार 838 इतकी आहे.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 82, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 83, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 80, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.
हेही वाचा - येथे माणूसकी ओशाळली.. कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेऊन नातेवाईक पसार
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोरोना बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 9 हजार 49
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 10 हजार 905
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 727
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 83 हजार 692
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 838
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.40 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-228
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 773
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-76
हेही वाचा - धक्कादायक : अवघ्या १३ तासात आई, वडील आणि मुलाचा कोरोनाने मृत्यू