ETV Bharat / state

बहिणसह तिच्या प्रियकराच्या हत्येप्रकरणी भावाला फाशीची शिक्षा - नांदेड

भोकर तालुक्यातील थेरबन येथील दिगांबर बाबुराव दासरे, व त्याचा चुलत भाऊ मोहन नागोराव दासरे या दोघांनी आपली बहिण पूजा दासरे ही प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे तिचा व तिच्या प्रियकरचा खून केला होता.

बहीण आणि तिच्या प्रियकराच्या हत्येप्रकरणी भावाला फाशीची शिक्षा
author img

By

Published : Jul 18, 2019, 3:08 PM IST

नांदेड - बहिण आणि तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या भावाला फाशीची शिक्षा, तर आरोपी भावाला साथ देणाऱ्या चुलतभावाला जन्मठेपेची शिक्षा भोकरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली आहे. न्यायाधीश एस. एम. शेख यांनी ही शिक्षा सुनावली.

बहीण आणि तिच्या प्रियकराच्या हत्येप्रकरणी भावाला फाशीची शिक्षा

भोकर तालुक्यातील थेरबन येथील दिगांबर बाबुराव दासरे, व त्याचा चुलत भाऊ मोहन नागोराव दासरे या दोघांनी आपली बहिण पूजा दासरे ही प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे तिचा व तिच्या प्रियकरचा खून केला होता. विवाहानंतरही आपली बहिण इतर समाजाच्या मुलाबरोबर पळून गेल्याचा या दोघांचा मनात राग होता. त्यामुळे या दोघांनी तेलंगणातील खरबळा येथून सैराट प्रेमीयुगल पूजा बाबुराव दासरे आणि गोविंद विठ्ठल कराळे यांना तुमचे लग्न लावून देतो, असे सांगून तेलंगणा सीमेवर नेले आणि त्यांचा खून केला होता.

या हत्येप्रकरणी भोकर पोलिसात दिगांबर व मोहन यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार या प्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी दोन्ही आरोपींना दोषी ठरवले होते.

Intro:नांदेड : बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या भावाला फाशीची शिक्षा, तर आरोपी भावाला साथ देणाऱ्या चुलतभावाला जन्मठेपेची शिक्षा.

नांदेड : बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या भावाला फाशीची शिक्षा, तर आरोपी भावाला साथ देणाऱ्या चुलतभावाला जन्मठेपेची शिक्षा भोकरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. शेख यांनी निर्णय दिला आहेBody:भोकर तालुक्यातील थेरबन येथील दिगांबर बाबुराव दासरे, व त्याचा चुलत भाऊ मोहन नागोराव दासरे या दोघांनी आपली बहीण पुजा दासरे ही विवाहानंतर इतर समाजाच्या मुलाबरोबर पळून गेल्याने याचा राग मनात धरुन तेलंगणातील खरबळा येथून सैराट प्रेमीयुगल पुजा बाबुराव दासरे व गोविंद विठ्ठल कराळे यांना बासरमध्ये तुमचे लग्न लावून देतो असे सांगून दोघांनी दुचाकीवर बसवून आणले.तेलंगणा सीमेवर दिवशी बु.परिसरात एका नाल्यात धारदार शस्त्राने
दोघांचीही दि.२३ जुलै २०१७ रोजी हत्या केली.या ऑनर किलींग प्रकरणी भोकर पोलिसात दिगांबर व मोहन यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.Conclusion:या प्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी दोन्ही आरोपींना काल बुधवारी दोषी ठरवले होते.
आरोपी भाऊ दिगंबर दासरे ला फाशी ची शिक्षा, तर आरोपीचा चुलत भाऊ असलेल्या मनोज दासरे ला जन्मठेप असा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम.शेख यांनी दिले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.