ETV Bharat / state

बेपत्ता व्यक्तीचा गोदातिरी 'पोत्यात' आढळला मृतदेह; खुनाचा गुन्हा दाखल

गेल्या दहा दिवसापासून अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील रहिवाशी देविदास बारसे (वय-४०) हे बेपत्ता होते. दरम्यान, शहराच्या डंकीन परिसरात गोदावरी नदी किनारी बुधवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास पोत्यात बांधलेल्या अवस्थेत बारसे यांचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी वजीराबाद ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author img

By

Published : Feb 1, 2019, 10:52 AM IST

देविदास बारसे

नांदेड - गेल्या दहा दिवसापासून अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील रहिवाशी देविदास बारसे (वय-४०) हे बेपत्ता होते. दरम्यान, शहराच्या डंकीन परिसरात गोदावरी नदी किनारी बुधवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास पोत्यात बांधलेल्या अवस्थेत बारसे यांचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी वजीराबाद ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देविदास दत्तरामजी बारसे हे २१ जानेवारीला एका नातेवाईकाला घेऊन नांदेडमधील रुग्णालयात आले होते. त्यानंतर नातेवाईकास रुग्णालयात दाखल करून गावाकडे जातो म्हणून दवाखान्यातून निघाले. मात्र, देविदास बारसे घरी पोहोचलेच नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध केली. पण त्यांचा कोठेच थांगपत्ता लागला नसल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

पोलीस तपास सुरू असतानाच बुधवारी गोदावरी नदीकिनारी डंकीन भागात पोत्यात बांधलेला एक मृतदेह आढळला. यावेळी पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. मृतदेहाचा फोटो पाहून बारसे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर ३१ जानेवारीला बारसे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस आता खुनाचे नेमके कारण व आरोपींचा शोध घेत आहेत.

undefined

Intro:दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह गोदावरी नदीत सापडला;खुनाचा गुन्हा दाखल

Body:दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह गोदावरी नदीत सापडला;खुनाचा गुन्हा दाखल

नांदेड:गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता असलेल्या देविदास बारसे (वय-४०) यांचा पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह शहराच्या डंकीन परीसरात गोदावरीच्या किनारी बुधवार दि.३० सांयकाळी साडेपाचच्या सुमारास सापडला. या प्रकरणी वजीराबाद ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील देविदास दत्तरामजी बारसे दि.२१ जानेवारी रोजी एका नातेवाईकाला घेऊन नांदेडला आले होते. नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करून गावाकडे जातो म्हणून दवाखान्यातुन निघाले. पण देविदास बारसे घरी पोहोचलेच नाही. त्यांची नातेवाईकांनी शोधाशोध केली पण न सापडल्यामुळे बेपत्ता झाल्याची तक्रार अर्धापुर पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान बुधवारी गोदावरी नदीच्या किनारी डंकीन भागात त्यांचा पोत्यात टाकलेला मृतदेह आढळला. यावेळी पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर टाकल्याने मृतकाची लगेच ओळख पटली. दि.३१ जानेवारी रोजी पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. खुनाचे नेमके स्पष्ट कारण सध्या माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.