नांदेड- तीर्थक्षेत्र माहूर मधल्या दत्तशिखर देवस्थानाने कोरोनाच्या लढाईसाठी मोठी मदत केली आहे. देवस्थानाच्या वतीने ग्रामीण भागातील डॉक्टरांसाठी पन्नास पीपीई किट मदत म्हणून देण्यात आले आहेत. ही मदत ग्रामीण रुग्णालयाकडे देण्यात आली.
कोरोना पासून डॉक्टरांचे संरक्षण व्हावे पीपीई किट आणि ग्रामीण रुग्णालयास आवश्यक असणाऱ्या गाद्यांची मदत देवस्थानाच्यावतीने करण्यात आली आहे. दत्तशिखर संस्थानचे महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या आशीर्वादाने ही मदत माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आली आहे.
पीपीई किट रुग्णालयाच्या प्रतिनिधींकडे देताना मंदिराचे मुख्य पुजारी वासुदेव भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर मंडळींच्या आरोग्याची काळजी घेत केलेली ही मदत राज्यातील मंदिरे आणि सामाजिक संस्थांसाठी अनुकरणीय आहे. कोरोनाच्या लढाईत सर्व घटक जस जमेल तसे प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे चित्र आहे.