ETV Bharat / state

Cyber Crime : खात्यातून परस्पर काढलेले ६ लाख मिळाले परत; नांदेड सायबर टीमचे यश - Electricity Bill

खात्यातून परस्पर काढलेले ६ लाख रूपय तक्रारदाराच्या खात्यात वर्ग करण्यात नांदेड सायबर टीमला ( Cyber Team ) यश आले आहे. इलेक्ट्रिसिटी बिल ( Electricity Bill ) अपडेट करून घेण्यासाठी मोबाईल नंबरवर लिंक पाठवून अज्ञाताने एकाची ६ लाख रुपायांची फसवणुक केली होती.

Cyber Crime
सायबर गुन्हे
author img

By

Published : Jul 16, 2022, 8:11 PM IST

नांदेड - इलेक्ट्रिसिटी बिल अपडेट ( Electricity Bill ) करून घेण्यासाठी मोबाईल नंबरवर लिंक पाठवून अज्ञाताने ६ लाख रुपये परस्पर काढून एका नागरिकांची फसवणूक केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने भाग्यनगर पोलीस, सायबर टीमच्या ( Cyber Team ) अधिकाऱ्यांनी तांत्रिकरीत्या हे प्रकरण हाताळले आहे. हैकरच्या खात्यात रक्कम जाऊ न देता तक्रारदार व्यक्तीच्या खात्यात वळती करण्यात पोलिसांना यश आहे. पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे खात्यातून गायब झालेली रक्कम परत मिळाल्याने तक्रारदाराने पोलिसांचे आभार मानले आहे.

सायबर गुन्हे

परस्पर काढले ६ लाख - याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहराच्या हद्दीतील भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक २७ में २०२२ रोजी बँक खात्यातून परसपर रक्कम काढून घेऊन फसवणूक झाल्याची तक्रार गौतम मारोती भावे यांनी दिला होती. अज्ञात व्यक्तीने सूरवातीला भावे यांचे मोबाईल नंबरवर इलेक्ट्रिसिटी बिल अपडेट करून घेण्यासाठी एस.एम.एस. पाठवला होता. त्यात इलेक्ट्रिसिटी बिल अपडेट करून घेण्यासाठी मोबाईल क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले होते. क्विक सपोर्ट (quik support) नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. ऐप डाउनलोड करताच भावे यांच्या खात्यातील एकूण ६ लाख रुपये परस्पर काढून घेतले होते. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भावे यांनी तात्काळ भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी केली होता.

तक्रारदाराच्या खात्यात ६ लाख जमा - तक्रारीची दखल घेऊन सायबर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनि. सोपान थोरवे, पोलीस नाईक विलास राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडून घडलेल्या घटनेबाबत सर्व हकीकत जाणून घेतली. संबधित बँका, नोडल अधिकारी यांना ईमेलद्वारे संपर्क साधून पत्रव्यवहार केला. सदर कारवाईच्या अनुषंगाने संबधित बँक अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी पाठपुरावा करून तांत्रिक रित्या सायबरने तपास करून हैकरच्या खात्यात ६ लाखाची रक्कम जाऊ न देता ती रक्कम तक्रारदार व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात यश मिळविले आहे.

अशी होतेय ऑनलाईन फसवणूक - हैकरद्वारे अज्ञात नंबरहुन ऍप्लिकेशन डॉनलोड करण्यास सांगून मोठ्या चतुराईने बैंक अधिकारी असल्याचे भासवून मोबाईल धारकांकडून पासवर्ड विचारले जाते. त्यानंतर संबंधिताने पवर्ड सांगताच स्क्रीन शेयरिंग केले जाते. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल आपला स्वतःचा असल्याप्रमाणे वापरता येतो. त्यातून नागरिकांची रक्कम परस्पर काढली जाऊन फसवणूक होते. त्यासाठी नागरिकांनी देखील सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण कोणतीही बैंक मोबाईलद्वारे पासवर्ड विचारत नाही.

९१ हजारची रक्कमही मिळाली - याच बरोबर नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रारदार फरिदा केरसी जिला यांची दिनाक २६ जून २०२२ रोजी क्रेडिट व डेबिट कार्ड वरून ९१ हजार ९०८ रुपयांची फसवणूक ऑनलाईन पार्सलच्या झाली होती. सदर तक्राराईवरून सायबर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सोपान थोरवे, पोलीस नाईक विलास राठोड यांनी पाठपुरावा केल्यामुळे सदरची रक्कम तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. सायबर पोलिसांनी दोन ठिकाणी वेगवेगळ्या घटनेत फसवणुकीतून गेलेली रक्कम तांत्रिकपद्दाथीने तपास करून परत मिळवून दिल्यामुळे सर्व स्तरातून सायबर पोलीस विभागाचे अभिनंदन केले जात आहे.

हेही वाचा - Prakash Ambedkar Exclusive : यशवंत सिन्हांनी राष्ट्रपतीच्या शर्यतीतून माघार घ्यावी; प्रकाश आंबेडकरांनी दिलं स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.