ETV Bharat / state

नांदेडमध्ये २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी..! - नांदेड कोरोना संख्या

नांदेड जिल्ह्यात मागील एक ते दीड आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली आहे.

Curfew in Nanded
Curfew in Nanded
author img

By

Published : Mar 21, 2021, 8:41 PM IST

नांदेड - जिल्ह्यात मागील एक ते दीड आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अंशतः लॉकडाऊन लावण्यासह अन्य काही उपाययोजना हाती घेतल्या. परंतु नागरिकांनी त्यास गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याची गरज निर्माण झाल्याचे आमचे मत बनले आहे. परंतु लॉकडाऊन लगेच लावता येत नसते, त्यासाठी लोकांना काही वेळ द्यावा लागतो. ही बाब लक्ष्यात घेऊन दि.२५ मार्च ते ४ एप्रिल संचारबंदी राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.

जिल्ह्यात लॉकडाऊन लावायचे अथवा कसे याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी रविवारी एक बैठक बोलावली होती. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी दि.२५ मार्चचे मध्यरात्रीपासून ते ४ एप्रिल मध्यरात्री पर्यंत विविध नियम व अटी काही व्यावसायाना काही वेळेपुरती सूट देऊन संचारबंदी होणार आहे.

या बैठकीस जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त अजितपालसिंग संधू, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत संचारबंदी लावण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही पोहचलो असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिली.

या सेवा राहणार बंद -

हॉटेल्स, उपहारगृह, बार तसेच सार्वजनिक कार्यक्रम.
• मटन , चिकन अंडी व मासे विक्री
• सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी
सर्व प्रकारचे बांधकाम व कंन्स्ट्रक्शनची कामे
चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, रिसॉर्ट, मॉल, आठवडी बाजार
सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रम
सलुन व ब्युटी पार्लरची दुकाने
मोकळ्या जागेत, उद्यानांमध्ये फिरणे.
सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉक
• शाळा , महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग पूर्णतः बंद

..या सेवा राहणार सुरू..

किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील.
दुध विक्री व वितरण सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल.
भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी सात ते १० या वेळेतच करता येईल .
• खासगी व सार्वजनिक वैद्यकिय सेवा सुरु राहतील.
पेट्रोल पंप व गॅस वितरण सेवा सुरु राहणार असून कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक असेल.
वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेतच वर्तमानपत्रांचे वितरण करता येईल.
पाणी पुरवठा ( जार, टॅकर ) दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
• स्वस्त धान्य दुकाने सुरु राहतील.
अंत्यविधीसाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल.
औषध विक्रीचे दुकाने २४ तास सुरु राहतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.