नांदेड - संभाव्य लॉकडाऊनच्या भीतीने नांदेडमध्ये तळीरामांनी रांगा लाऊन मद्य खरेदी केली आहे. मागीलवर्षी लॉकडाऊनच्या काळात काळ्या बाजारात चार ते सहा पट दराने मद्यविक्री झाली होती. त्यामुळे मद्याची पुन्हा टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून तळीराम सावध झाले आहेत. त्यातच उद्या(बुधवार) मद्यविक्री बंद असल्याने तळीरामांनी आज(मंगळवार) मोठी गर्दी करत मद्याचा साठा जमा केला आहे. मद्याची खरेदी करताना तळीरामांनी सर्वच नियमांना हरताळ फासल्याचे चित्र पहायला मिळाले.
दुकानवरील गर्दी वाढलीदारूच्या दुकानांवर गर्दी होत आहे. शासन लॉकडाऊन व कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद राहतील. याबाबत सर्वत्र संभ्रम आहे. यानंतर दुकानांवर गर्दी होऊन जिल्हाधिकाऱ्यांचे नियम पायदळी तुडवले जात आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
दारूची दुकाने बंद राहणार याची शंका तळीरामाना असल्यामुळे ते आपला स्टॉक करून घेण्यात व्यस्त आहेत. लॉकडाऊनची चाहूल लागल्यानंतर एकीकडे जग बुडाले तरी चालेल, आपली सोय मात्र झाली पाहिजे या तंद्रीतच हे तळीराम दिसत आहे. नांदेड शहरातील प्रत्येक दुकानावर गर्दी पहायला मिळत आहे. एकीकडे रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून प्रशासन त्रस्त असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.हेही वाचा-मागील वर्षात कामगारांना कवडीची मदत नाही, मग आता काय देणार - चंद्रकांत पाटील