ETV Bharat / state

नांदेड : ८३ हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका - crop loss in Nanded district

नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला ५७ कोटी रुपयांची गरज आहे.

अतिवृष्टीचा फटका
अतिवृष्टीचा फटका
author img

By

Published : Sep 28, 2020, 12:33 PM IST

नांदेड - दरवर्षी दुष्काळाचा फटका बसणाऱ्या नांदेड जिल्ह्याला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. उत्तरा नक्षत्र १३ सप्टेंबरला सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात पावसाने नांदेड, बिलोली, देगलूर व मुखेड आदी तालुक्याला झोडपले आहे. जिल्ह्यातील ८३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे महसूल खात्याच्या यंत्रणेने केलेल्या पाहणीतून समोर आले.

हिमायतनगर, कंधार, लोहा, किनवट आणि माहूर हे पाच तालुके वगळता इतर ११ तालुक्यांतील ३८१ गावांमध्ये पिकांची हानी झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात १३ ते १६ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर होता. काही ठिकाणी वीज कोसळून ४० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. अतिवृष्टीच्या थैमानात एक व्यक्तीचा मृत्यू झाला. बिलोली तालुक्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात ४६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. देगलूर तालुक्यात ५८ हजार क्षेत्रापैकी १७ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. तर, मुखेड तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्राला पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भोकर, अर्धापूर आणि मुदखेड या तीनही तालुक्यांना अतिवृष्टीचा जबर फटका बसला आहे. तर, नांदेड तालुक्यातील सुमारे साडेनऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीचा फटका बसला. त्यात काढलेले आणि काढणीला आलेले पीक उद्ध्वस्त झाले. तर, यंदा चांगल्या स्थितीतील पिकांना अतिवृष्टीने अक्षरशः: आडवे केले.

जिल्ह्याला ५७ कोटी रुपयांची गरज

अतिवृष्टीमुळे पिकांची हानी झाल्यानंतर राज्य सरकारकडून जिरायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार ८२ हजार ९६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याला मदत वाटपासाठी सुमारे ५७ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.