ETV Bharat / state

शाब्बास..! लॉकडाऊनमध्ये बाप-लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला

सिद्धार्थ यांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात विहीर खोदण्याचे ठरवले आणि कामाला सुरुवात केली. या कामी त्यांना त्यांचा मुलगा पंकज याने साथ दिली. दोघे दिवस उजाडला की दिवसभर विहीर खोदायचे. हा नित्यक्रम पाच दिवस चालला. पाचव्या दिवशी सिद्धार्थ आणि पंकज यांच्या कष्टाचे चीज झाले. विहिरीला पाणी लागलं. तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

covid-19 lockdown : father and son dig 16 ft deep well outside house in nanded district
लॉकडाऊनमध्ये बाप-लेकाने खोदली विहीर
author img

By

Published : Jun 1, 2020, 8:05 AM IST

नांदेड - लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून घरात राहणे अनेकांना कंटाळवाणे झालेले आहे. मात्र, याच काळाचा सदुपयोग करीत एका बाप-लेकाने ५ दिवसात १६ फूट विहीर खोदली. या विहिरीला चांगले पाणी लागण्याने पिण्याच्या पाण्याची समस्या मिटल्याने, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेल्या मुळझरा गावातील सिद्धार्थ देवके आणि त्याचा मुलगा पंकज यांनी ही अफलातून कामगिरी केली आहे.

मुळझरा हे दुर्गम गाव म्हणून ओळखला जातो. या गावात सिद्धार्थ देवके आपल्या कुटुंबासह राहतात. त्याचा बँडबाजाचा व्यवसाय आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे लोकं मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न उरकत आहेत. त्यामुळे सिद्धार्थ यांच्याकडे लॉकडाऊनमध्ये काही काम नव्हते. तेव्हा त्यांनी दरवर्षी पाण्यासाठी होणारी भटकंतीचा विचार करून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊनमध्ये बाप-लेकाने खोदली विहीर...

सिद्धार्थ यांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात विहीर खोदण्याचे ठरवले आणि कामाला सुरुवात केली. या कामी त्यांना त्यांचा मुलगा पंकज याने साथ दिली. दोघे दिवस उजाडला की दिवसभर विहीर खोदायचे. हा नित्यक्रम पाच दिवस चालला. पाचव्या दिवशी सिद्धार्थ आणि पंकज यांच्या कष्टाचे चीज झाले. विहिरीला पाणी लागलं. तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कारण त्यांनी पाण्याच्या टंचाईवर कायमची मात केली.

सिद्धार्थ आणि पंकज या बाप लेकांनी अवघ्या पाच दिवसात सोळा फूट विहिर खोदली. आता ते कच्च्या स्वरूपात खोदलेल्या या विहिरीसाठी सिमेंटचे कठडे देखील घरीच बनवत आहेत. दरम्यान, पाणीटंचाईची समस्या ही प्रत्येक उन्हाळ्यात मुळझरा येथे पाचवीला पुजलेली असते. त्यामुळे पाण्याचे मोल येथील प्रत्येक नागरिकाला समजते. सिद्धार्थ आणि पंकज यांनी सुद्धा हे मोल लक्षात घेऊन पाण्याच्या समस्येवर मात करणारी एक अनोखी व इतरांना आदर्शवत कामगिरी करून दाखविली आहे.

हेही वाचा - पीक कर्ज मागणीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 6 जून पर्यंत मुदतवाढ

हेही वाचा - नांदेडमध्ये आतापर्यंत १०३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी; शनिवारी एका रुग्णाची भर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.