ETV Bharat / state

नांदेड : कोरोनाची स्थिती सुधारतेय; बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तिप्पट - नांदेड कोरोना अपडेट

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून बुधवारी बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा दर केवळ 18.60 टक्के पर्यंत खाली आला आहे.

number of patients recovering in nanded
number of patients recovering in nanded
author img

By

Published : May 5, 2021, 11:44 PM IST

नांदेड - जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून बुधवारी बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा दर केवळ 18.60 टक्के पर्यंत खाली आला आहे. गत तीन दिवसात केवळ बारा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

422 रूग्ण बाधित तर 1 हजार 256 जणांना सुट्टी -

आज प्राप्त झालेल्या 2 हजार 268 अहवालापैकी 422 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 312 तर अँटिजेन तपासणीद्वारे 110 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 82 हजार 298 एवढी झाली आहे. बुधवारी 1 हजार 256 कोरोना बाधित झाले बरे झाले असून आतापर्यंत यातील 73 हजार 565 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 7 हजार 412 रुग्ण उपचार घेत असून 203 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

तीन दिवसात बारा जणांचा मृत्यू -

दि. 3 ते 5 मे या तीन दिवसांच्या कालावधीत 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 651 एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.74 टक्के आहे.

उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 58 भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 25 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -

एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 73 हजार 60
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 80हजार 338
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 82 हजार 898
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 73 हजार 565
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 651
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.74 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-20
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-376
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 7 हजार 412
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-203

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.