नांदेड - हिमायतनगर तालुक्यातील कोरोनाच्या एका संशयित रुग्णाला नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सौदी अरेबिया येथून भारतात आलेल्या या संशयिताला सध्या हिमायतनगरमधील ग्रामीण रूणालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - COVID-19 : इराणमधील भारतीयांना आणण्यासाठी तीन विमाने जाणार..
हिमायतनगर तालुक्यातील एक जण सौदी अरेबियामध्ये कामानिमित्त होता. तो आता भारतात परतला आहे. मात्र, तो कोरोनाचा संशयित असल्याने त्याला अगोदर नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी त्यांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले. जोपर्यंत त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्याला हिमायतनगरच्या ग्रामीण रूणालयातील आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड यांनी दिली. दरम्यान, नागरीकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही डॉ.गायकवाड यांनी केले आहे.