नांदेड - आभाळ फाटल्यावर ठिगळ कोठेकोठे लावायचे, अशी परिस्थिती नांदेड शहरात कोरोना साथीमुळे निर्माण झाली आहे. कारण दररोज रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाकडून दररोज खाटा वाढविल्या जात असल्या तरी दैनंदिन बेडचा तुटवडा ठरलेला आहे. बेडची उपलब्धता वाढविण्यात येत असली तरी रुग्ण वाढीचा वेग त्या तुलनेत अधिक असल्याने प्रशासनाचे गणित बिघडत असल्याचे म्हणण्यापेक्षा रुग्णसंख्या व बेडचे ताळमेळ लावण्यात ते कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसते. ही वस्तुस्थिती असली तरी त्यावर प्रभावी उपाय केव्हा शोधला जाईल, असा सवाल आता जनताच विचारत आहे.
कोरोना साथीचा स्फोट....!
नांदेड शहरात कोरोना साथीचा स्फोट झाला आहे. दररोज सरासरी हजार रुग्णांची भर पडत आहे. अलीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने काही प्रमाणात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयात हजारो रूग्णांची सोय करता आली असती पण तेथे काही शेकडा रुग्णच उपचार घेऊ शकतात, अशी सोय आहे. त्यानंतर खाजगी कोविड सेंटरची संख्या वाढविण्यात आली आहे. प्रशासन त्यांच्यापरिने प्रयत्न करत असले तरी हे प्रयत्न अपुरे पडताना दिसून येत आहेत. मृत्यूचा दरही वाढतच आहे. त्यातच कोरोना रूग्णांची दररोज एक हजाराने भर पडत आहे. उपलब्ध उपचार व्यवस्था दररोज कमी पडत आहे. कोण्यातरी रुग्णालयात बेड शिल्लक आहे का, हे शोधत रुग्णाला सोबत घेऊन त्यांच्या परिवाराला शोध मोहीमेवर निघावे लागत आहे.
बेडसाठी करावी लागत आहे विनवणी...!
शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयात बेड शिल्लक असल्याचे प्रेसनोटमध्ये सांगितले जात असले तरी, काही मिनिटात ही रूग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे सांगितले जात आहे . व्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असली तरी, ती अपुरी पडत आहे. त्यातच स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी रुग्ण व त्याच्या परिवाराला गावभर फिरावे लागत आहे. भयभीत रुग्ण व त्याचे नातेवाईक प्रत्येक रूग्णालयाच्या गेटला जाऊन एक बेडची व्यवस्था करा, अशी विनवणी करताना आढळून येत आहेत. या परिस्थितीची चर्चा व्हावी, कारण रस्त्यावर लॉकडाऊन आणि रुग्णालयात जागा नाही , असे किती दिवस चालणार , असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे .
बेड मिळेना, उपचारही मिळेना !
बेडच्या शोधात जे रुग्ण खासगी किंवा शासकीय कोविड रुग्णालयामध्ये येत आहेत, त्यांना बेड नसल्याचे सांगून परत पाठविले जात आहे. ही अपरिहार्यता मानली तरी त्यांच्यावर उपचाराचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. बेड नाहीत पण, प्रत्येक कोविड रुग्णालयासमोर डॉक्टरांचे पथक बसवून त्यांच्यावर प्राथमिक उपचार तरी केले जावेत म्हणजे रुग्णांना निदान उपचार तरी लवकर मिळतील या पर्यायाचा विचार अगोदरच करणे आवश्यक होते. पण, आताही वेळ गेलेली नाही. प्रत्येक रुग्णांपर्यंत उपचार पोहोचला पाहिजे, याची व्यवस्था झालीच पाहिजे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9 शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 10, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय नांदेड येथे 12 एवढी आहे.
नांदेडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या चिंताजनक; खाटांची संख्या वाढवूनही पडतेय अपुरी..! - नांदेड कोरोना घडामोडी
बेडची उपलब्धता वाढविण्यात येत असली तरी रुग्ण वाढीचा वेग त्या तुलनेत अधिक असल्याने प्रशासनाचे गणित बिघडत असल्याचे म्हणण्यापेक्षा रुग्णसंख्या व बेडचे ताळमेळ लावण्यात ते कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसते. ही वस्तुस्थिती असली तरी त्यावर प्रभावी उपाय केव्हा शोधला जाईल, असा सवाल आता जनताच विचारत आहे.