ETV Bharat / state

सिमेंट व स्टीलचे दर नियंत्रणात आणा, बांधकाम व्यावसायिकांचे आंदोलन - बांधकाम व्यावसायिकांचे आंदोलन

सिमेंट व स्टीलच्या किंमती नियंत्रणात आणावेत, या मागणीसाठी बांधकाम व्यावसायिकांनी आंदोलन पुकारलं आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्यांसाठी बिल्डर असोसिएशन या संस्थेने देशभर आंदोलन पुकारलं आहे.

Builders' agitation in nanded
Builders' agitation in nanded
author img

By

Published : Feb 12, 2021, 6:45 PM IST

Updated : Feb 12, 2021, 7:02 PM IST

नांदेड - सिमेंट व स्टीलच्या किंमती नियंत्रणात आणावेत, या मागणीसाठी बांधकाम व्यावसायिकांनी आंदोलन पुकारलं आहे. सिमेंट आणि स्टीलचे दर कमी करावेत, अशी मागणी करत नांदेड येथे शुक्रवारी बांधकाम व्यवसायिकांनी धरणे आंदोलन केले.

सर्वसामान्यांना फटका -

सिमेंट कंपन्याच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला आहे. दरवर्षी सिमेंट आणि स्टीलच्या दरात वाढ होत आहे. मात्र यावर सरकारचे नियंत्रण नाही. यामुळे बांधकाम व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे.

कृषीनंतरचे सर्वात जास्त जी.डी.पी देणारं क्षेत्र -

बांधकाम क्षेत्र हे आपल्या भारत देशातील सर्वात जास्त जीडीपी निर्माण करणारे एकूण योजनेच्या ५० टक्के पेक्षा अधिक आर्थिक व्याप्ती असणारे क्षेत्र आहे. बांधकाम क्षेत्रावर ४०० पेक्षा अधिक संलग्न व्यवसाय संस्था अवलंबून आहेत. शेतीनंतरचे ६ कोटीपेक्षा अधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. म्हणूनच भारताची आर्थिक योजना तयार करताना नेहमीच बांधकाम क्षेत्रास झुकते माप दिले जाते.

शहरी भागात राहणाऱ्यांना घरे पुरवण्याची जबाबदारी -

एका आकडेवारीनुसार आपल्या देशात २०३० साली ६० कोटी लोकसंख्या तरुणांची असणार आहे. या पिढीसाठी घरे पुरविण्यासाठीचे मोठे काम आपणास करावयाचे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ३१ टक्के लोकसंख्या ही नागरी भागात रहात होती. संपूर्ण जगात ७० ते ८० टक्के लोकसंख्या ही नागरी किंवा शहरी भागात राहते. आपल्या देशातील बांधकाम व्यावसायिकांना या स्थलांतरीत लोकसंख्येसाठी घरे पुरविणे ही एक मोठी जबाबदारी नजिकच्या काळात निर्माण झाली आहे.

देशव्यापी आंदोलन -

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया ही संपूर्ण भारतभर इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर व रियल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांची संस्था आहे. सन १९४१ साली स्थापन झालेल्या या संस्थेची देशभर २०० पेक्षा जास्त सेंटर्स असून २०,००० पेक्षा अधिक व्यावसायिक संस्था व अप्रत्यक्षरित्या एक लाखाहून अधिक सदस्य आहेत. बांधकाम क्षेत्रात मुलभूत सुधारणा करणे, सरकार स्तरावर ध्येय धोरणे ठरवणे, स्थानिक स्थानिक स्तरावर व्यावसायिकांच्या अडचणी दूर करणे ही या संस्थेची कार्य आहेत. देश उन्नतीसाठी बांधकाम क्षेत्र अग्रेसर ठेवण्याचे काम ही संस्था करते. बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्यांसाठी बिल्डर असोसिएशन या संस्थेने देशभर आंदोलन पुकारलं आहे.

सरकारचे नियंत्रण असावे -

स्टील आणि सिमेंटचे वाढते दर नियंत्रणात आणून बांधकाम व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. शुक्रवारी एक दिवसीय आंदोलन करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

Last Updated : Feb 12, 2021, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.