नांदेड - शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी प्रशासनाने आता शहरात २९ ठिकाणी कन्टेनमेंट झोन घोषित केले आहेत.
कोरोनाचा पहिला रुग्ण शहरातील पीरबुऱ्हानगर भागात २२ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर प्रशासनाने पीरबुऱ्हाण व परिसर सील करुन कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२५ वर पोहोचली आहे.
प्रशासनाने शहरातील पीरबुऱ्हाणनगर, अबचलनगर, अंबानगर, सांगवी, लंगरसाहिब गुरुद्वारा परिसर, रहेमतनगर, हतई, दिवाणी बावडी (करबला), कुंभारटेकडी, स्नेहनगर पोलीस कॉलनी, विवेक नगर, इतवारा, मिल्लतनगर, जिजामाता कॉलनी, जोशी गल्ली, शिवाजी नगर, नई आबादी, रहेमान हॉस्पीटल देगलूर नाका, खय्युम प्लॉट, लेबरकॉलनी, उमर कॉलनी, गुलजारबाग,हनुमान मंदिर परिसर इतवारा, आर्य विहार अपार्टमेंट विद्युतनगर, सिद्धनाथपुरी, लहुजीनगर वाघाळा, कृष्णामाई अपार्टमेंट तरोडा (खु.), संभाजी चौक सिडको, अलीनगर (खोजा कॉलनी), रावतपुरा वाघीरोड, नांदेडमधील कन्टेनमेंट झोनचा समावेश आहे.
शासनाच्या निर्णयानुसार कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेला परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केला जातो. कन्टेनमेंट झोनचा कालावधी २८ दिवसाचा आहे.