नांदेड - शहरात दोन दिवसीय कुसुम महोत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण श्रीजया आणि सुजया दोन्ही मुलीनी या महोत्सवात स्टॉल लावला आहे. कै शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशातब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा एक भाग म्हणून महिलांसाठी कुसुम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांनी केले. महिला उद्योजकांना प्रवाहात आणण्यासाठी आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार अमित चव्हाण यांनी दिली.
या महोत्सवात विविध प्रकारचे १६० स्टॉल नांदेडकरांना आकर्षित करत आहेत. दोन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुलीनी ही यावेळी विविध वस्तू विक्रीचा स्टॉल लावल्याने अनेकांनी ही या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे.