ETV Bharat / state

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सभेला लोक जमविण्याच्या कारणावरून पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची - Vinod Patil

भोकर येथील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर आणि माजी नगरसेवक मकसुद गोंदवाले यांच्यात लोक जमविण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली.

पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
author img

By

Published : Apr 15, 2019, 6:39 AM IST

Updated : Apr 15, 2019, 7:47 AM IST

नांदेड - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भोकर येथे शनिवारी सभा होती. त्यापूर्वी सभेला लोक जमविण्याच्या कारणावरून काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांत बाचाबाची झाली. व्यासपीठावरच हा सर्व प्रकार घडल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.

भोकर येथील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर आणि माजी नगरसेवक मकसुद गोंदवाले यांच्यात लोक जमविण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. हे पाहताच कार्यकर्त्यांनी तात्काळ मध्यस्थी केल्याने पुढील वाद टळला.

पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

निवडणूक असताना सभेच्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये आपआपसात भांडण झाले आहे. याप्रकाराने काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या भोकर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. येणारा काळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण करते की काय अशी चर्चा सुरू आहे.

Intro:नांदेड - काँग्रेस प्रदेशाध्यक्षच्या सभेत गोंधळ, भोकर येथील हक्काच्या मतदार संघातचं गटबाजी आली समोर.

अँकर - नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी चे नेते छगन भुजबळ यांची भोकर येथे सभा सुरु होण्या आगोदर सभेला लोकं जमविण्याच्या कारणावरून काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांत बाचाबाची झाली.Body:
त्यामुळे स्टेजवरच हा सर्व प्रकार घडल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. भोकर येथील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर आणि माजी नगरसेवक मकसुद गोंदवाले यांच्यात लोकं जमविण्याचा कारणावरून ही बाचाबाची झाली आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला दरम्यान,Conclusion:
निवडणुकीत सभेच्या ठिकाणी आपसात भांडणाचे प्रकार घडल्याने काँग्रेसचा हक्काचा मतदार संघ असलेल्या भोकर मध्ये काँग्रेस मधील गटबाजी समोर आली असून येणारा काळ अशोक चव्हाण यांच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण करते की काय अशी चर्चा सध्या जोर धरत आहे
Last Updated : Apr 15, 2019, 7:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.