नांदेड - लुटेरी मोदी सरकार, पेट्रोल हुआ सौ पार.. !, पेट्रोल महंगाई से जनता बेहाल.., मोदी के पूंजीपती मित्र मालामाल.. !, पेट्रोल डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लुटमार ! या घोषणाबाजीत नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करुन केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण -
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे.
पेट्रोल डिझेलची शंभरी पार, मोदीजी बस्स करा जनतेची लुटमार.. नांदेडमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन
काँग्रेसच्या वतीने नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करुन केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.