ETV Bharat / state

हदगाव मतदारसंघाच काँग्रेसला धक्का; उमेदवारी न मिळाल्याने चाभरेकरांचा शिवसेनेत प्रवेश - maharashtra assembly election 2019

हदगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छूक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा फटका बसला असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसकडून इच्छुक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला
author img

By

Published : Oct 9, 2019, 12:49 PM IST

नांदेड - हदगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छूक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. चाभरेकर यांना पक्षाने यावेळीही एकदा डावलले त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. चाभरेकर आणि पाथरडकर या दोन्ही गटाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा - 'शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर अजूनही ठाम'

सेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील यांना मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. हदगावातील काँग्रेसचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते असलेले बाबूराव पाथरडकर हेही सेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही बड्या नेत्यांना आपलेसे करण्यात आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना यश आले आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा फटका बसला असल्याचे मानले जात आहे. बाबूराव कदम यांच्या बंडामुळे याआगोदर हदगाव जिल्ह्यात चर्चेत आले आहे.

हेही वाचा - 'मंत्रालयाला आग लागली नव्हती; तर ती सुनिल तटकरेंनी लावली होती'

काँग्रेसच्या या नेत्यामुळे हदगावकडे सर्वांचे लक्ष लागलेल आहे. बुधवारी या सर्व नेत्यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन सेना प्रवेश केला आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी चाभरेकर आणि पाथरडकर यांना शिवबंधन बांधले. यावेळी नागेश पाटील यांना बहुमताने निवडून आणा असे आवाहनही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान आता हे सर्व जुने काँग्रेसचे गट सेनेत गेल्याने हदगावच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा - भारत उत्सवांचा देश, आमच्याकडे हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा - पंतप्रधान

Intro:नांदेड : हदगाव काँग्रेसला खिंडार, काँग्रेसकडुन इच्छुक असलेल्या उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश.

नांदेड : हदगाव विधानसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. चाभरेकर यांना पक्षाने यावेळीही एकदा डावलले त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. आज चाभरेकर आणि पाथरडकर या दोन्ही गटाने सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील यांना मोठं बळ मिळाल आहे.Body:हदगावातील काँग्रेसचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते असलेले बाबूराव पाथरडकर हेही सेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही बड्या नेत्यांना आपलंस करण्यात आमदार नागेश पाटील आष्ठीकर यांना यश आल आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा फटका बसणार असल्याचे मानल्या जात आहे. बाबूराव कदम यांच्या बंडामुळे आधीच हदगाव जिल्ह्यात चर्चेत आल आहे.Conclusion:
त्यातच आता काँग्रेसच्या या नेत्यामुळे हदगावकडे सर्वांचे लक्ष लागलेल आहे.आज या सर्व नेत्यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन सेना प्रवेश केलाय. स्वतः उद्धव ठाकरे यांनी चाभरेकर आणि पाथरडकर यांना शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश दिलाय. यावेळी नागेश पाटील यांना बहुमताने निवडून आणा अस आवाहन स्वतः उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना केलय. दरम्यान आता हे सर्व जुने काँग्रेस चे गट सेनेत गेल्याने हदगावच राजकीय गणित पूर्णपणे बदलल आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.