नांदेड - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या बदली नंतर त्यांच्या जागी परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १३ फेब्रुवारी रोजी त्यांची बदली करण्यात आली असून नांदेडचे नूतन जिल्हा अधिकारी म्हणून पी. शिवशंकर यांनी पदभार स्विकारला आहे.
हेही वाचा... 'वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा'
जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील माफियागीरीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पी. शिवशंकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. वर्धा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. परभणी येथे ३ एप्रिल २०१७ पासून परभणीचे जिल्हा अधिकारी म्हणून रुजू होते.