हिंगोली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे खासदार हेमंत पाटील ( MP Hemant Patil ) व कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर ( ( Kalmanuri Vidhan Sabha MLA Santosh Bangar ) यांच्या प्रेमापोटी हिंगोली येथे कावड यात्रेत ( CM Eknath Shinde Visit to Nanded ) सहभागी झाले आहेत. मुंबईत मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक घाईगडबडीत आटोपून भर पावसात मुख्यमंत्री नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात ( CM Participated Kavad Yatra in Hingoli ) दाखल झाले आहेत. सभेत त्यांनी सरकार हे सर्वसामान्यांचे ( It is a Government of Common People ) असल्याचे सांगत जनतेचे प्रश्न हे शंभर टक्के सोडवणार असल्याची ग्वाही देत 80 हजार पोलिस भरती करणार असल्याची घोषणा केली.
संतोष बांगर यांच्या प्रेमापोटी मुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड, हिंगोली जिल्हा दौऱ्यात फेरबद्दल झाले होते. मुंबईत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेगाने हालचाली सुरू असल्याने, हा दौरा रद्द झाल्याची ही चर्चा झाली होती. अखेर एवढ्या घाई गडबडीत का होईना खासदार हेमंत पाटील ( MP Hemant Patil ) आणि कळमनुरी विधानसभा आमदार संतोष बांगर यांच्या प्रेमापोटी मुख्यमंत्री नांदेड हिंगोली दौऱ्यावर आले आहेत.
मुख्यमंत्री कावड यात्रेत सहभागी : मुख्यमंत्री नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर कयाधु अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रेत सहभागी झाले. नंतर हिंगोली शहरातील गांधी चोक येथे झालेल्या सभेत त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भाजप-शिवसेना युतीसाठी काय नाही ते केले, कुठेसुद्धा कमी पडलो नाही. ज्या लोकांची आपण सत्ता स्थापन करण्यासाठी एवढा प्रयत्न केला, त्या लोकांनी नेमके आपल्यासाठी केले तरी काय? मात्र हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न शंभर टक्के सोडविणार याची मी ग्वाही देतो.
शिवसेनेचा ढाण्या वाघ संतोष बांगर : कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या बोलण्याने सर्वत्र चर्चेत आहेत. ते जसे बोलतात तसे कामदेखील करतात. त्यांनीच जिल्ह्याची अनेक प्रश्न माझ्यासमोर मांडले आहेत. ते प्रश्न नक्कीच सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून संतोष बांगर यांची तोंड भरून मुख्यमंत्री शिंदे यांनी स्तुती केली.
अडीच वर्षांपूर्वीच हे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होते : विरोधकांना आपण आपल्या कार्यातून उत्तर देणार आहोत. आम्ही जिथे जातोय तिथे हजारोंच्या संख्येने नागरिक आमचा सत्कार करताहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातले हे सरकार आहे. खरंतर सरकार मागील अडीच वर्षांपूर्वी स्थापन व्हायला पाहिजे होते. मात्र, उशिरा का होईना हे सरकार स्थापन झाले.
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार स्थापन : तुमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार सोडविण्यासाठी ठामपणे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. खरंतर ज्या लोकांनी बाळासाहेबांना जवळही उभे केले नव्हते त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. खरोखर ते दुर्दैव होते. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे येण्यासाठी काम करतोय. बाळासाहेबांचे विचारच आम्ही घेऊनच आम्ही पुढे चाललो आहे.
हेही वाचा : Cabinet Expansion Invitation: अजित पवारांसह केंद्रीय मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे आमंत्रण