ETV Bharat / state

बड्या अधिकाऱ्याच्या पुत्राला वाचवण्यासाठी उभा केला 'डमी'चालक, पोलीस ठाण्यात तणाव - अपघात

या प्रकरणात डमी चालक समोर आणल्याचे लक्षात येताच जमाव चांगलाच संतप्त झाला होता. या घटनेतील मूळ चालक आणल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने भाग्‍यनगर पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

police
पोलीस ठाण्यात तणाव
author img

By

Published : Feb 8, 2020, 9:46 PM IST

Updated : Feb 8, 2020, 11:15 PM IST

नांदेड - शहरात एका बड्या अधिकाऱ्याच्या पुत्राने तरुणाला कारने चिरडल्याचा संतापजनक प्रकार आज घडला. या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तरुणाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी चक्क डमी चालक पोलीस ठाण्यात हजर केल्याची घटना आज पहावयास मिळाली. हा प्रकार मृताचे नातेवाईक आणि जमावाने हाणून पाडला.

बड्या अधिकाऱ्याच्या पुत्राला वाचवण्यासाठी उभा केला 'डमी'चालक, पोलीस ठाण्यात तणाव

या प्रकरणात डमी चालक समोर आणल्याचे लक्षात येताच जमाव चांगलाच संतप्त झाला होता. या घटनेतील मूळ चालक आणल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने भाग्‍यनगर पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा - सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला

नांदेड शहरातील डीमार्ट रस्त्यावरील चांदोजी मंगल कार्यालयापुढे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चांदू रघुनाथ सूर्यवंशी या तरुणाला कारने (एम एच २६ एएफ ३९२) जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर कार चालक फरार झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतहेद ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मृताच्या कुटुंबीयांनी घेतला होता. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनुरुद्ध काकडे हे आपल्या लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, जमावाने आधी आरोपीला अटक करा, मग मृतदेह उचलू, असा निर्वाणीचा इशारा दिल्याने भाग्यनगर पोलिसांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.

हेही वाचा - फटाक्यांच्या स्फोटात पंजाबमध्ये 15 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

त्यात पोलिसांनी अपघातातील कार पंचनामा न करताच भाग्यनगर पोलीस ठाण्यात आणल्याने जमावाचा राग अनावर झाला. मृतदेह उचलण्याआधीच कार कशी काय हलवली, म्हणून संतप्त जमावाने या परिसरात दगडफेक केली. ट्रीगार्डचीही तोडफोड केली. याशिवाय पोलीस ठाण्याच्या परिसरात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड हे पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी जमावाशी चर्चा न करता आमदारांना चर्चेसाठी बोलावल्याने जमाव संतप्त झाला.

हेही वाचा - प्रियांका गांधींच्या मुलाने पहिल्यांदा केले मतदान, म्हणाला...

भाग्यनगर पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत असताना पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे सांगितले. त्यावेळी जमावाने आम्हाला चालक पाहू द्या, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी चालकाला जमावासमोर उभे केले. यावेळी तो चालक अपघाताशी संबंधित नसल्याचे जमावाने सांगितल्यानंतर पोलिसांचीही तारांबळ उडाली. एवढेच नाही, तर ज्या डमी चालकाला लोकांसमोर हजर करण्यात आले, त्याने स्वतः 'मी अपघातातला चालक नाही मला तहसीलदार बाईंनी पाठवल्यामुळे मी इथे आलो' असे सांगितल्याने पुन्हा एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेतील मूळ चालकाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर मयताच्या कुटुंबीयांनी मृतदेह घटनास्थळावरून हलवला. याप्रकरणी तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Intro:नांदेड : वा साहेब; आपल्या पुत्राला वाचविण्यासाठी जेंव्हा बडा अधिकारीच देतो चक्क 'डमी' चालक.....

नांदेड : अपघातामध्ये 'डमी' चालक देण्याचा प्रकार तसा नवा नाही. नांदेडमध्ये हजारोंच्या जनसमुदायासमोर एका बड्या अधिकाऱ्याच्या पुत्राने एका तरुणाला चिरडल्याचा संतापजनक प्रकार घडला. पण शासनातील अधिकारीचं जेंव्हा हजारो जनसमुदायाला न जुमानता आपल्या पुत्रावरील गुन्हा लपविण्यासाठी चक्क डमी चालक देत होता. हा सारा प्रकार संतप्त नातेवाईक व जमावाने हाणून पाडला. पण पांढर पेशातील सरकारी बाबूना एका जीवाची किंमत किती पर्वा असते? हे पुन्हा सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले.Body:एखादेवेळी बेइमानी लाजवील इतका निर्लज्ज प्रकार शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्यात पाहावयास मिळाला. एका तरुणाला आपल्या कारने उडवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बड्या अधिकाऱ्याच्या चालक नातलागास या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी चक्क डमी चालक पोलीस ठाण्यात हजर केल्याची घटना पहावयास मिळाली . त्यामुळे उपस्थित जमावाने संताप व्यक्त करून घटनेतील मूळचालक आणल्याशिवाय मयताचे प्रेत उचलणार नाही असा पवित्रा घेतल्याने भाग्‍यनगर पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.Conclusion:नांदेड शहरातील डी मार्ट रोडवरील चांदोजी मंगल कार्यालयापुढे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास चांदू रघुनाथ सूर्यवंशी या तरुणास कार क्रमांक एम एच २६ एएफ ३९२ ने जोराची धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला . घटनेनंतर कार चालक फरार झाला. घटनेची माहिती कळताच मयताच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फसके, भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनुरुद्ध काकडे हे आपल्या लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र जमावाने आधी आरोपीला अटक करा मग प्रेत उचलू असा निर्वाणीचा पवित्रा घेतल्याने भाग्यनगर पोलिसांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता . त्यात पोलिसांनी अपघातातील कार पंचनामा न करताच भाग्यनगर पोलीस ठाण्यात आणल्याने जमावाचा राग अनावर झाला. प्रेत उचलल्या आधीच कार कशी काय हलवली म्हणून संतप्त जमावाने या परिसरात दगडफेक केली . ट्रीगार्डची तोडफोड केली. शिवाय जमा मोठ्या संख्येने भाग्यनगर पोलिस ठाण्यात जमला होता. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातही रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अतिरिक्त पोलीस अधिक्षक दतराम राठोड हे पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी जमावाशी चर्चा न करता आमदारांशी चर्चा करण्यासाठी आमदारास बोलावल्याने जमावाचा पुन्हा एकदा संताप वाढला होता. भाग्यनगर पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत असताना भाग्यनगर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे सांगितले . त्यावेळी जमावाने आम्हाला चालक पाहू द्या अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी सदरील चालकाला जमावासमोर उभे केले. यावेळी तो चालक अपघाताशी संबंधित नसल्याचे जमावाने सांगितल्यानंतर पोलिसांचीही तारांबळ उडाली. एवढेच नाही तर ज्या डमी चालकाला लोकांसमोर हजर करण्यात आले त्याने स्वतः मी अपघातातला चालक नाही मला तहसीलदार बाईनी पाठवल्यामुळे मी इथे आलो असे सांगितल्याने पुन्हा एकच खळबळ उडाली. पोलीस मुळ आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत होता. या घटनेतील मूळ चालक चालका विरूद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर मयताच्या कुटुंबीयांनी मयताचे प्रेत घटनास्थळावरून हलवले.
दम्यान एका तरुनाचा प्राण घेणाऱ्या आरोपीला वाचविण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी डमी चालक पाठवून माणुसकीचा खून केला आहे. सदरील आधीकरी हा बेईमनीचे धंदे मोध्या प्रमाणात करून याआधीच चर्चेत होता. परंतु आज बेइमानी लाजेल असा प्रकार उघड झाल्याने संबंधित तहसीलदार विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 8, 2020, 11:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.