ETV Bharat / state

नांदेडमध्ये मुलाने केला आई-वडिलांवर चाकूने हल्ला - नांदेड गुन्हे वृत्त

शहरातील विवेक नगर भागात रविवारी दुपारी एका मुलाने आई-वडिलांवर चाकुने हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

child-attacked-by-parents-in-nanded
नांदेडमध्ये मुलाने केला आई-वडिलांवर चाकूने हल्ला
author img

By

Published : Feb 18, 2020, 10:47 AM IST

नांदेड - शहरातील विवेक नगर भागात रविवारी दुपारी एका मुलाने आई-वडिलांवर चाकुने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेतील जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये मुलाने केला आई-वडिलांवर चाकूने हल्ला

विवेकनगरमधील रहिवाशी डॉ. संजय सखाराम लाठकर व त्यांच्या पत्नी हे दोघेजण घरी असतांना त्यांचा मुलगा वल्लभ लाठकर (वय २८) घरी असेवडील आला. माझा विवाह का करत नाहीत, म्हणून डॉ. संजय लाठकर यांच्यासोबत वाद घालून गोंधळ घातला. घरातील भाजी कापण्याच्या चाकुने त्याने डॉ. लाठकर यांच्या छातीवर वार करुन जखमी केले. त्यांना सोडविण्यासाठी त्याची आई आली असता त्यांच्यावरही चाकुने वार केला. या घटनेत डॉक्टर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. डॉ. लाठकर यांच्या घरात आरडाओरड होत असल्याने शेजारी मदतीसाठी धावून आले.

या घटनेची माहिती भाग्यनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस निरिक्षक अनिरुद्ध काकडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डॉ. संजय लाठकर व त्यांच्या पत्नी या घटनेत गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. लाठकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात वल्लभ लाठकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.