नांदेड- उत्त्तर रेल्वेने कळविल्या प्रमाणे दिल्ली विभागातील तुघलकाबाद ते पळवल रेल्वेस्थानका दरम्यान असणाऱ्या बल्लभगड रेल्वे स्थानकावर चौथ्या रेल्वे लाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच तिसरी लाईन बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नॉन इंटर लॉक वर्किंगचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानकावर थांबणाऱ्या बऱ्याच गाड्या थांबणार नाहीत. तर या रेल्वे स्थानका ऐवजी 4 किलोमीटर पुढे असणाऱ्या फरीदाबाद न्यू जंक्शन रेल्वे स्थानकावर गाड्या थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
या रेल्वे स्थानकावरुन धावणाऱ्या बऱ्याच गाड्या काही काळा पुरत्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही रेल्वे गाड्या मार्ग बदलून धावणार आहेत. या नॉन इंटर लॉक वर्किंगच्या कालावधीत नांदेड रेल्वे विभागातून निघणाऱ्या रेल्वे गाड्यावर पुढील प्रमाणे परिणाम होणार आहे.
पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या-
- गाडी क्र- 12421 नांदेड ते अमृतसर दि. 04.09.2019
2. गाडी क्र-12486 श्री गंगानगर ते नांदेड दि. 03.09.2019
3. गाडी क्र-12485 नांदेड ते श्री गंगानगर दि. 05.09.2019
4. गाडी क्र-22458 अम्ब अन्दौरा ते नांदेड दि. 05.09.2019
5. गाडी क्र- 22457 नांदेड ते अम्ब अन्दौरा दि. 07.09.2019
मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या-
1. गाडी क्र 12715 नांदेड ते अमृतसर दि. 2, 4, 5 आणि 7 सप्टेंबर आग्रा, मितवाल, खुर्जा ज., चिपियाना बु., नवी दिल्ली
2. गाडी क्र- 12716 अमृतसर ते नांदेड दि. 7.9.2019 नवी दिल्ली खुर्जा ज., चिपियाना बु., मितवाल, आग्रा
3. गाडी क्र- 12716 अमृतसर ते नांदेड दि.8.9.2019 चिपियाना बु., खुर्जा ज., मितवाल, आग्रा
4. गाडी क्र-12485 नांदेड ते श्री गंगा नगर दि.02.09.2019