ETV Bharat / state

केंद्रीय पथक नांदेडच्या दौऱ्यावर, नुकसानग्रस्त शेतांची करणार पाहणी - तेलबिया

परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी शुक्रवार ते रविवार, असे तीन दिवस केंद्रीय पथक नांदेडच्या दौऱ्यावर येणार आहे.

नुकसानग्रस्त शेती
author img

By

Published : Nov 21, 2019, 1:22 PM IST

नांदेड - परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवार (दि. 22 नोव्हें.) ते रविवार (दि. 24 नोव्हें.) या कालावधीत नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

नुकसानग्रस्त शेती

जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक, अशा एकूण 6 लाख 48 हजार 316 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. याचा 4 लाख 18 हजार 436 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. दरम्यान, खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही केंद्रीय पथक पाहणीसाठी आले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत विविध पक्षांकडून केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती. यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपुगल यांचे पथक तीन दिवस नांदेड दौऱ्यावर येत आहे.

यात अर्थ मंत्रालयाचे सल्लागार दिनानाथ, हैदराबाद येथील कृषी, शेतकरी कल्याण व तेलबिया संचालनालयाचे संचालक आर. पी. सिंग, जयपूर येथील कृषी, शेतकरी कल्याण विकास संचालनालयाचे संचालक डॉ. सुभाष चंद्रा यांचा समावेश आहे. हे पथक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहे. या पथकासमवेत जिल्हाधिकारी, कृषी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना राज्याच्या महसूल व वन विभागाच्या उपसचिवांनी दिल्या आहेत.

हेही वाचा - नांदेड : ११ महिन्यात शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

Intro:परतीच्या पावसाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात केंद्रीय पथक तीन दिवसांच्या दौऱ्यावर...!

नांदेड : परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक ( दि . २२ ) ते ( दि. २४ ) अशा तीन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर येणार आहे . या वेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी Body:परतीच्या पावसाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात केंद्रीय पथक तीन दिवसांच्या दौऱ्यावर...!

नांदेड : परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक ( दि . २२ ) ते ( दि. २४ ) अशा तीन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर येणार आहे . या वेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली .

जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील कोरडवाहू , बागायती व बहुवार्षिक , अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. याचा लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना फटका बसला होता . दरम्यान खरिपातील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही केंद्राचे पथक पाहणीसाठी आले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या बाबत विविध पक्षांकडून केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती. यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपुगल ( आयएएस ) यांचे पथक दि. २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नांदेड दौऱ्यावर येत आहे. यात अर्थ मंत्रालयाचे सल्लागार दिना नाथ, हैदराबाद येथील कृषी , शेतकरी कल्याण व तेलबिया संचालणालयाचे संचालक आर. पी. सिंग, जयपूर येथील कृषी, शेतकरी कल्याण विकास संचालनालयाचे संचालक डॉ. सुभाष चंद्रा यांचा समावेश आहे. हे पथक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहे. या पथकासमवेत जिल्हाधिकारी, कृषी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना राज्याच्या महसूल व वन विभागाच्या उपसचिवांनी दिल्या आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.