नांदेड - राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने थैमान घातलेले आहे. मुसळधार पावसाने राज्याच्या अनेक भागामध्ये भूस्खलन, दरडी कोसळणे, रस्ते आणि रेल्वे रुळ हे पाण्याखाली गेले आहेत. तर काही ठिकाणी रेल्वे रुळ वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीला फटका बसला असून या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
या पैकी नांदेड विभागातील पुढील गाड्या पुढे दिलेल्या तारखेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत.
- गाडी क्र- ०११४ ही मुंबई-आदिलाबाद जाणारी नंदीग्राम विशेष गाडी दिनांक २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पर्यंत पूर्णतः रद्द
- गाडी क्र-०११४२ ही आदिलाबाद-मुंबई जाणारी नंदीग्राम विशेष गाडी दि. २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पर्यंत पूर्णतः रद्द
- गाडी क्र-०७६११ ही नांदेड-मुंबई जाणारी राज्य राणी विशेष ही गाडी दि. २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पर्यंत पूर्णतः रद्द
- गाडी क्र-०७६१२ ही मुंबई-नांदेड जाणारी राज्य राणी विशेष ही गाडी दि. २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पर्यंत पूर्णतः रद्द
- गाडी क्र-०७६१३ ही पनवेल-नांदेड जाणारी पनवेल विशेष हि गाडी दि. २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पर्यंत पूर्णतः रद्द
- गाडी क्र.०७६१४ ही नांदेड-पनवेल जाणारी पनवेल विशेष हि गाडी दि. २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पर्यंत पूर्णतः रद्द
- गाडी क्र.०७६१७ ही नांदेड-मुंबई जाणारी तपोवन विशेष हि गाडी दि. २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पर्यंत पूर्णतः रद्द
- गाडी क्र.०७६१८ ही मुंबई-नांदेड जाणारी तपोवन विशेष हि गाडी दि.२५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पर्यंत पूर्णतः रद्द