ETV Bharat / state

तीन तलाक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; नांदेडमधील प्रकार

तीन तलाक कायद्याचे उल्लंघन करत तोंडी तलाक दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

triple talaq news from nanded
तीन तलाक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; नांदेडमधील प्रकार
author img

By

Published : Jan 17, 2020, 3:10 PM IST

Updated : Jan 17, 2020, 3:20 PM IST

नांदेड - तीन तलाक कायद्याचे उल्लंघन करत तोंडी तलाक दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या नांदेडमधील केळी मार्केट भागात वास्तव्यास असलेल्या तलक अंजुम शेख तौफीक (वय-22) या विवाहितेचे पतीसोबतचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. तलकने कलम 498 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ती पतीच्या घरी राहण्याऐवजी सध्या आजोबांकडे वास्तव्यास आहे.

या ठिकाणी जाऊन शेख तौफीक शेख युसुफ (वय -28) या व्यक्तीने 15 जानेवारीला दुपारी 3.30 च्या दरम्यान घराबाहेर बोलावले. यानंतर त्याने आणि तीन वेळा तलाक म्हणून आपल्यात कोणताही संबंध उरला नसल्याचे सांगितले. या तोंडी तलाक नंतर संबंधित तरूणीने पोलिसांत धाव घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे पुढील तपास करत आहे.

Intro:नांदेड : पुन्हा एकदा तलाक... तलाक... तलाक...!
- कायद्याचे उल्लंघन करीत तलाक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

नांदेड : नांदेड : कायद्याचे उल्लंघन करीत तोंडी तलाक दिल्याप्रकरणी एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:जुन्या नांदेडमधील केळी मार्केट भागातील रहिवासी तलक अंजुम शेख तौफीक(२२) या विवाहितेचे पतीसोबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तलकने कलम ४९८ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ती शेख तौफीकच्या घरी राहण्याऐवजी आजोबाकडे राहत आहे. तेथे जाऊन शेख तौफीक शेख युसुफ (२८) रा.आसरानगर नांदेड याने १५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता तिला घराबाहेर बोलावले आणि तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणून तुझा आणि माझा आता काही एक संबंध नाही, तुझे तू बघून घे म्हणून निघून गेला.Conclusion:
याबाबत तलक अंजम हिने दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुरनं १२/२० नोंद करण्यात आला आहे. पोहेकाँ शिंदे पुढील तपास करीत आहेत.
Last Updated : Jan 17, 2020, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.