नांदेड : नांदेड-हैदराबाद महामार्गावर कार आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चारजण ठार झालेत तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात रात्री आठच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंचेली फाटा इथे झाला.
शंकरराव जाधव, महानंदा जाधव, धनराज जाधव आणि कल्पना शिंदे अशी मृतांची नावे आहेत. तर स्वाती पाटील ही गंभीर जखमी असून तिच्यावर नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायगाव तालुक्यातील (तमा) टाकळी येथून केरुर येथे कारने पाचहीजण जात होते. त्यावेळी देगलूरकडून येणारा ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा, मुलगी ठार झाली. तर विवाहित असलेली नात स्वाती बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातस्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघातामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ही ठप्प झाली होती.