ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra :  एक दिवसासाठी बसस्थानक बंद प्रवाशांना मनस्ताप

author img

By

Published : Nov 10, 2022, 1:02 PM IST

भारत जोडो यात्रेमुळे ( Bharat Jodo Yatra ) नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आजच्या दिवसापूरते बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. शहरा बाहेर असलेल्या वसरणी इथल्या वसंतराव नाईक कॉलेजच्या ( Vasantrao Naik College ) मोकळ्या मैदानात तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आले आहे

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा निमित्याने बसस्थानक एक दिवसासाठी बंद

नांदेड : भारत जोडो यात्रेमुळे ( Bharat Jodo Yatra ) नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आजच्या दिवसापूरते बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. शहराबाहेर असलेल्या वसरणी इथल्या वसंतराव नाईक कॉलेजच्या ( Vasantrao Naik College ) मोकळ्या मैदानात तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आले आहे. बसस्थानकासह नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेडमधील मध्यवर्ती बसस्थानक बंद : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेनिमित्त १० नोव्हेंबर रोजी शहराच्या नवीन मोंढा मैदान येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी शहरांमध्ये जनसमुदाय व वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून नांदेडमधील मध्यवर्ती बसस्थानक बंद ठेवून सदरील बसस्थानकावरून जाणाऱ्या व येणाऱ्या फेऱ्यांची वाहतूक शहराबाहेर तात्पुरते बसस्थानक उभारून त्या ठिकाणाहून करण्यात येणार आहे.

येथून होणार बसेसची वाहतूक : राज्य परिवहन बसेसची वाहतूक शहराबाहेरून करण्याच्या पोलीस प्रशासनाकडून सूचना मिळाल्या होत्या. त्या अनुषंगाने १० नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या बसेसच्या वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद राहणार असून मध्यवर्ती बसस्थानकावरून होणारी बसेसची वाहतूक ही वसंतराव नाईक कॉलेज मैदान, डेअरी चौक, वसरणी, नांदेड येथून करण्यात येणार आहे.

प्रवाशांकरता प्रवासी मित्र : लोहा, सोनखेडकडे जाणारी व येणारी वाहतूक आंबेडकर चौक, विष्णुपुरी या मार्गाने करण्यात येणार आहे. मुखेड, देगलूर, बिलोलीकडे जाणारी व येणारी वाहतूक किवळा शिराढोण- तेलूर फाटा- कवठा या मार्गाने करण्यात येणार आहे. भोकर, किनवट, हदगाव, माहूर, हिंगोली, वसमतकडे जाणारी व येणारी वाहतूक लातूर फाटा धनेगाव चौक बायपास मार्गाने शंकरराव चव्हाण चौक आसनापूल या मार्गाने करण्यात येणार आहे. उपरोक्त मार्गावर प्रवाशांच्या माहितीकरिता प्रवासी मित्रांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांच्याद्वारे प्रवाशांची चढउतार करण्यास मदत करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन विभागाचे नांदेड विभाग नियंत्रक यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.