नांदेड - राज्यसभा निवडणुकीत ( Rajyasabha Election Result ) भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे घोडेबाजाराला काहीही महत्व नाही, असं वक्तव्य रासपाचे नेते महादेव जाणकर यांनी केलं आहे. नुकतेच राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात भाजपाने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत तीन उमेदवार निवडून आणले. यावरून निवडणुकीत मोठ्याप्रमाणात घोडेबार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे.
राज्यसभेवर भाजपाचे तीन उमेदवार विजयी - राज्यसभा निवडणुकीत भाजपाला तीन जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आता घोडेबाजाराला काहीही महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया जाणकार यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यासाठी ते नांदेड येथे ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पहिल्या फेरीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये संजय राऊत यांना ४१ मत मिळाली. प्रफुल्ल पटेल यांना ४३, इम्रान प्रतापगढी यांना ४४ मत मिळाली. तर पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मत मिळाली आहेत. तर पहिल्या फेरीमध्ये धनंजय महाडिक यांना २७ मत मिळाली आहेत आणि पवार यांना ३३ मत मिळाली आहेत. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मनाला जात आहे. तर भाजपाने घोडेबाजार करत तीन उमेदवार निवडून आणल्याचा आरोप होत आहे. यावरून जाणकर यांनी भाजपा विजयी झाल्यामुळे या आरोपांना काहीही महत्व नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
पंकजा मुंडे भाजपाच्या नेत्या आहेत - विधान परिषदेसाठी पंकजा मुंढे यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे मुंढे समर्थकांमध्ये मोठी नाराजी आहे. मुंढे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. यावर जाणकार यांनी सावध पवित्रा घेतला आहे. पंकजा मुंढे माझी बहिण आहे, त्यासोबतच त्या भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, उमेदवारी देणे हा भाजपाच्या शिस्तीचा भाग आहे. त्यामुळे याविषयावर बोलणे योग्य नाही, असं जाणकर म्हणाले.