नांदेड - अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आणि दिव्यांग बांधवांची गरज लक्षात घेऊन त्यांना धान्य किट व मास्कचे वाटप केले गेले. भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला गेला. तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या किट घरपोच केल्या आहेत.
भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एक लाख नागरिकांना विविध माध्यमातून मदत करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबात शक्यतो इतर कोणी कर्ता पुरुष नसतो. तसेच दिव्यांग बांधवांनाही काम करता येत नसल्यामुळे त्यांचीही परिस्थिती नाजूक असते. या दोन्ही उपेक्षित घटकांचा विचार करून चिखलीकर यांनी धान्य किटचे वाटप केले.
भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गरजू कुटुंबांना या वस्तूंचे घरपोच वाटप केले. यासाठी भाजपा युवा नेते अँड. किशोर देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ.लक्ष्मण इंगोले, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर कदम पाटील, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव सखाराम क्षीरसागर saयांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.