ETV Bharat / state

नांदेडमध्ये पक्षांतरांच्या विषयावरुन भाजप-काँग्रेस नगरसेवक भिडले

सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले.

author img

By

Published : Aug 8, 2019, 9:26 PM IST

नांदेडमध्ये पक्षांतरांच्या विषयावरुन भाजप-काँग्रेस नगरसेवक भिडले

नांदेड - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले. त्यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ करत दिपकसिंह रावत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे सभा काही काळ तहकुब करण्यात आली. तर भाजप नगरसेवक दिपकसिंह रावत यांना निलंबित करण्यात आले.

नांदेडमध्ये पक्षांतरांच्या विषयावरुन भाजप-काँग्रेस नगरसेवक भिडले

नांदेड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महापौर दिक्षा धबाले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनपा आयुक्त लहुराज माळी यांच्या उपस्थितीत पार पडली. यासभेत बोलताना भाजप नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक खासदार प्रताप पाटलांच्या संपर्कात तसेच भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य केले. त्यावेळी काँग्रेस नगरसेवकांनी त्यावर जोरदार आक्षेप नोंदवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर काँग्रेस नगरसेवक फईम हे दिपकसिंह रावत यांच्यावर धावून गेले. यावेळी दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. सभेतील गोंधळ पाहता सभा काही काळासाठी तहकुब करण्यात आली.

सभेच्या सुरुवातीस सर्व नगरसेवकांनी शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, खड्डे या प्रश्नावर अधिकार्‍यांना धारेवर धरले. अनेकांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांच्या या आक्रमक भुमिकेनंतर मनपा आयुक्त माळी यांनी शहरातील खड्ड्याच्या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन देत या कामात अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यासह गुत्तेदारावर देखील कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शहरातील पाणी प्रश्नाविषयी देखील नगरसेवक आक्रमक झाले.

भाजप सरकारच्या अभिनंदनाचा ठराव-

मनपाची सर्वसाधारण सभा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेता गुरप्रित कौर सोडी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा झालेला विजय, खासदार प्रताप पाटील यांचा विजय, तीन तलाक, कलम 370 विधेयक व मराठा आरक्षणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

Intro:नांदेड : पक्षांतरांच्या विषयावरुन भिडले भाजपा-काँग्रेस नगरसेवक

नांदेड : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य करताच काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ करत दिपकसिंह रावत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या गाेंंधळामुळे सभा काही काळ तहकुब करण्यात आली. तर भाजपा नगरसेवक दिपकसिंह रावत यांना निलंबित करण्यात आले.Body:नांदेड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महापौर दिक्षा धबाले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनपा आयुक्त लहुराज माळी यांच्या उपस्थितीत पार पडली. यासभेत बोलताना भाजपा नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक खासदार प्रताप पाटलांच्या संपर्कात तसेच भाजपाच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य करताच काँग्रेस नगरसेवकांनी त्यावर जोरदार आक्षेप नोंदवत गोेंधळ घालण्यास सुरुवात केली. तर काँग्रेस नगरसेवक फईम हे दिपकसिंह रावत यांच्यावर धावून आले या गोेंधळात एकमेकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. सभेतील गोंधळ पाहता सभा काही काळासाठी तहकुब करण्यात आली.
सभेच्या सुरुवातीस सर्व नगरसेवकांनी शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, खड्डे या प्रश्नावर अधिकार्‍यांना धारेवर धरले. अनेकांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांच्या या आक्रमक भुमिकेनंतर मनपा आयुक्त माळी यांनी शहरातील खड्ड्याच्या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन देत या कामात अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यासह गुत्तेदारावर देखील कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शहरातील पाणी प्रश्नाविषयी देखील नगरसेवक आक्रमक झाले. सभेत गोंधळच-गोंधळ निर्माण झाला. दिपकसिंह रावत व काँग्रेस नगरसेवकांच्या धक्का-बुक्कीच्या प्रकरानंतर तहकुब केलेली सभा पुन्हा सुरु करण्यात आल्यानंतर मनपा आयुक्त व नगरसेवक उमेश चव्हाण यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली तर नगरसेवक बाबुराव गजभारे यांनी कचरा प्रश्न उचलून धरत कचर्‍याचा घोटाळा होत असल्याचा आरोप करत मनपाला सदरील गुत्तेदार दररोज लाखोचा चुना लावत असल्याचे सांगत गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. एकुणच आजची सभा विविध प्रश्नावर व पक्षांतरांच्या मुद्याने चांगलीच गाजली.Conclusion:
भाजपा सरकारच्या अभिनंदनाचा ठराव
मनपाची सर्व साधारण सभा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्ष नेता सौ. गुरप्रितकौर सोडी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचा झालेला विजय, खा. प्रताप पाटील यांचा विजय, तिन तलाक, कलम 370 विधेयक व मराठा आरक्षणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
_____________________________________
FTP feed over
Ned GB Rada Vis 1
Ned GB Rada Vis 01
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.