नांदेड: बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर ( Builder Sanjay Biyani Murdered In Nanded ) त्यांच्या घरासमोर चाहते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. बियाणी यांच्या पत्नीने न्याय देण्याच्या मागणीसाठी टाहो फोडला. बियाणी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नांदेडच्या घरी ठेवण्यात आल. त्यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, अशी कुटुंबासह त्यांच्या मित्रमंडळींनी मागणी केली आहे. यावेळी मृत संजय बियाणी यांच्या पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या झाल्याचा आरोप केला. यात त्या हुकूमाच्या एक्क्याला अटक करण्याची मागणी ( Biyani Wife Demands Arrest Mastermind ) केली.
संजय बियाणी हत्येच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ! : नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मुख्य बाजार पेठा बंद ठेवण्यात आल्या. बियाणी यांच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घ्यावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला. नवा मोंढा, सराफा बाजार बंद ठेवण्यात आला. शिवाय शहरातील अनेक भागात व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. वजीराबाद भागात देखील आज बंद पाळण्यात आला.